उमरी तालुक्यातील हंगरगा येथील रहिवासी असलेल्या एका गरीब शेतकऱ्यांच्या गाय व वासरावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गाय वासरू मरण पावले असल्याची घटना आखाडयावर घडलीबांधलेल्या जनावरांनवर हल्ला करुन गाय वासराचा जीव घेतला आहेया सदरच्या घटनेत शेतकऱ्यांचे पन्नास ते ५५ हजार रुपायाचे नुकसान झाले ही सदरची घटना दिनांक २१ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या पहाटे अंदाजे ३ वाजण्याच्या वाजण्याच्या दरम्यान घडली आहे
तालुक्यातील हणमंत गणपत शिंदे या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात असलेल्या जागलीवर सदरचे गाय व वासरू बांधले होते परंतु मोकाट बिबट्यानी अचानक पणे गाय व वासरावर हल्ला चढविला आहे
हंगरगा येथील शेतकऱ्यांच्या गाय वासराचा मृत्यू झाला सदरील घटनेची माहिती वनपरिक्षेत्र आधिकारी प्रतिक मोडवान यांच्यासह उमरीचे वनपाल बाबुराव पेरलेवाड ,वनरक्षक मुंडे, मानद वन्यजीव रक्षक श्रीकर,शिंदे जिरोनेकर वनविभागाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे

0 Comments