Header Ads Widget

जिल्ह्यात बारावी बोर्डाच्या परीक्षा शांततेत विद्यार्थ्यांनी शांत चित्त मनाने दिली परीक्षा अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

     माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या शहरी भागासह ग्रामीण भागात इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेला दिनांक २१ फेब्रुवारी २०२३ रोजी पासून प्रारंभ झाला विद्यार्थ्यांनी अभ्यास करून तर शिक्षकांनी पूर्ण विषय शिकवून पूर्ण केले इयत्ता बारावीच्या परीक्षा पोलीस बंदोबस्तात सुरळीत व शांततेत परीक्षा चालू झाल्या आहे

शिक्षण विभागा कडून म्हणजे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर व शिक्षण अधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या कडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे
नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकर परदेशी यांनी नांदेड जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविले होते तेच  पॅटर्न अख्या महाराष्ट्रात राबविण्यात आले तशाच पद्धतीने जिल्ह्यात कॉफी मुक्त पद्धतीने इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षा चालू असल्याचे वास्तव चित्र ग्रामीण भागात सुद्धा पाहावयास मिळाले आहेसन २०१९ ते २०२० साली कोरोना महामारी मुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन शिक्षण घेता आले नसल्याने सुद्धा विद्यार्थी घरी बसूनच आपापल्या विषयाचा अभ्यास पूर्ण केला होता मागील दोन वर्षाखाली सुद्धा विद्यार्थी चांगले मार्क घेऊन इयत्ता बारावीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण झाले होते

जिल्ह्यात दिनांक २१ फेब्रुवारी २०२३ पासून इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात करण्यात आली असल्यामुळे या सदरच्या परीक्षेला मुली व मुले शांतचित्तेने परीक्षा देताना दिसून येत असून सदरच्या परीक्षा ह्या पोलीस बंदोबस्त शांततेत सुरळीत चालू झाल्या आहे 

Post a Comment

0 Comments