नायगाव विधानसभा मतदार संघाचे तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा तत्कालीन माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या कार्यकाळात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे नायगाव येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या इमारतीसाठी शिफारस पत्र देऊन सदरची इमारत मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळते आहेसार्वजनिक बांधकाम उपविभाग येथे पूर्वी या विभागाला दर्जेदार इमारत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आहे
नायगाव येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाची इमारत बांधण्यात येत असलेली ही तत्कालीन माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी पाठपुरावा करून सदरची इमारत मंजूर करून घेतली असल्याचे सांगण्यात येत आहेतालुक्यांचे ठिकाण असताना सुद्धा या विभागाला चांगल्या पद्धतीची इमारत अधिकारी व कर्मचाऱ्यांना नव्हती परंतु माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी आमदार असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता
नायगाव येथील सदरची इमारत मंजूर करून घेतले असल्यामुळे आजच्या परिस्थितीत नायगाव येथे सदरची इमारत भव्य बांधण्यात आली आणि जवळ पास दोन ते महिन्यातच कर्मचाऱ्यांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे

0 Comments