नायगाव तालुक्यातील अद्योगिक वसाहती अंतर्गत असलेल्या कृष्णुरच्या समाधान हॉटेल येथे आज दिनांक २१ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी चार वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे
" जिल्हा सहसंपर्क प्रमुख गंगाधर बडूरे यांनी माहिती दिली "
आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांची शिवसेना कामाला लागावे म्हणून हिंगोलीचे जिल्ह्याचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदरच्या महत्व पूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे
राज्यात गेल्या वर्षापासून राजकीय बंडाळी झाल्याचे नंतर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे
तालुक्यातील बरबडा येथील रहिवासी असलेले तथा जिल्हा सहसंपर्क प्रमुख गंगाधर बडूरे यांनी सुद्धा मुबंईत प्रवेश केला आहे
बाळासाहेबाची शिवसेनेला बळ देण्यासाठी सदरच्या बैठकीला महत्व दिले जाणार असल्यामुळे सदरच्या बैठकीला मोठया संख्येने कार्यकर्त्यानी उपस्थित राहण्याचे परत एकदा गंगाधर बडूरे आवाहन केले आहे

0 Comments