हिमायतनगर नागोराव शिंदे -
हिमायतनगर येथे श्री परमेश्वर मंदिराच्या वतीने महाशिवरात्र उत्सवा निमित्त भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यात्रा महोत्सवा दरम्यान विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत
या स्पर्धेत विजयी झालेल्या संघ, वैयक्तिक बक्षीसपात्र पात्र ठरलेल्या विजेत्यास दोन लाख रूपये बक्षिसाची घोषणा मंदिर कमेटीच्या वतीने करण्यात आली आहे.
१६ फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान संपन्न होत असलेल्या यात्रा महोत्सवात विविध स्पर्धा, संपन्न होणार आहेत.
व तसेच महाशिवरात्र उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दि.१६ गुरूवार ते २३ गुरूवार पर्यंत सकाळी ५ ते ६ काकडा भजन, ७ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ या वेळेत हरिकिर्तन यामध्ये ता. १६ गुरूवार हभप. चंद्रकांत महाराज उस्माननगरकर, दि. १७ शुक्रवार हभप.
सौ.,रूपालीताई संतोष देवराये, दि. १८ शनिवार हभप. सुरेश महाराज पोफाळीकर, दि. १९ रविवार हभप. संजय महाराज नागपुर्णे, दि. २० सोमवार हभप. रघुनाथ महाराज कराड, दि. २१ मंगळवार हभप. शिवाजी महाराज पवार , दि. २२ बुधवार हभप. नारायण महाराज गरड, दि. २३ गुरूवार दुपारी १ ते ४ रविदास महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. दहीहंडीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. यात्रा महोत्सव दरम्यान ता. २४ शुक्रवार रात्री ७ ते १०
शालेय बडबड गीत स्पर्धा, दि. २५ शनिवार रात्री ८ ते १० शालेय भाषण स्पर्धा, दि. २६ रविवार रात्री ८ ते ११ सदृढ बालक स्पर्धा, दि. २७ सोमवार सकाळी ११ ते ४ महिलांसाठी विविध स्पर्धा, दि. २८ मंगळवार सकाळी ११ पासून भव्य कब्बडी स्पर्धा, दि. १ बुधवार रात्री ८ ते ११ शालेय विविध गुणदर्शन स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम
दि. २ गुरूवार रात्री ८ वाजेपासून भव्य भजन स्पर्धा, दि. ३ शुक्रवार ला होणारी पशू प्रदर्शन
स्पर्धा लंपी आजारा मुळे रद्द करण्यात आली आहे. याच दिवशी म्हणजेच दि. ३ सकाळी ११ ते ३ वेळेत लहान मुले व मुलींसाठी भव्य फॅन्शी ड्रेस ( वेशभूषा ) स्पर्धा, अश्या अनेक स्पर्धा संपन्न होणार
दि
५ रविवारला यात्रेचा समारोप होणार आहे.
या भव्य यात्रा महोत्सवाचा भाविक भक्त व तसेच यात्रे करूनी लाभ घ्यावा. असे अवाहन परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रिश्रीमाळ, सेक्रेटरी अनंतराव देवकते, विश्वस्त लक्ष्मणराव शक्करगे, राजेश्वर चिंतावार, देविदासराव मुधोळकर, प्रकाश कोमावार, श्यामसुंदर पवनेकर, विठ्ठलराव वानखेडे, संभाजी जाधव, प्रकाश शिंदे, राजाराम झरेवाड,
वामनराव बनसोडे, श्रीमती लताताई पाध्ये, सौ. लताबाई मुलंगे, माधवराव पाळजकर, श्रिमती मथुराबाई भोयर,
शांतीलाल श्रिश्रीमाळ, अँड. दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड आदिंनी केले आहे.

0 Comments