Header Ads Widget

काहाळा टोलनाक्याची वसुली मात्र जोमात राज्य महामार्गावर सुविधेचा पत्ता नाही सार्वजनिक बांधकाम विभागासह कल्याण प्रशासनाचा सावळा गोंधळ - ? -

       माधव पवार
नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या काहाळा कल्याण टोल नाक्यावर दिवस रात्र मोठ्या प्रमाणात टोल वाहन धारका कडून टोल वसुली केल्या जाते परंतु याच मार्गावर जनतेसाठी सुविधा राबविल्या नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागासह कल्याण टोलनाका कहाळा प्रशासन ढकलचाल करत आहेत
राज्य या मार्गावर कोणत्याच ठिकाणी चांगल्या दर्जाचा निवारा अथवा शौचालय बांधण्यात आले नसल्यामुळे टोल वसुली मात्र जोमात सुविधा मात्र कोमात अशी गत निर्माण झाली असल्याचे चित्र वास्तव्यास पाहव्यास मिळत आहे

नायगाव तालुक्यातील मोजे कहाळा येथील कल्याण टोल नाक्याच्या बेजबाबदारपणामुळे राज्य महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे सुद्धा चित्र स्पष्ट दिसून येत असून या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगावच्या अधिकाऱ्यांसह कल्याण टोल नाक्याच्या प्रशासनाने बेदखल दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्यावर कसल्याच प्रकारच्या सुविधा राबविल्या जात नसल्याचे जनतेतुन बोलल्या जात आहे
नायगाव तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा निकृष्ट दर्जाचे टीना पत्रे टाकून बस स्टॅन्ड बनवले असले तरी त्या टीना पत्राच्या शेडमध्ये पंधरा ते वीस लोक सुद्धा बसत नाहीत असे शेड उभारले असल्यामुळे असा अधिकाऱ्याचा सावळा गोंधळ होत आहेमहाराष्ट्र शासनाने दरवर्षी झाडे लावा झाडे जगवा अशी घोषणा करते व अमलात आनले असली तरी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या नायगावच्या अधिकाऱ्यासह कल्याण टोल नाका प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे राज्य महामार्गाच्या डिव्हायडरवर झाडे लावले नसल्याचे दिसून येत आहे

घुंगराळ्या पासून जवळच असलेल्या उताराला काही फुलाचे झाडे लावले असले तरी रात्रीच्या वेळी वाहतूक चालवत असताना आमने सामने वाहनाची लाईट वाहन धारकाच्या डोळ्यावर पडत असल्यामुळे या राज्य महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहने चालवणे सुद्धा मुश्किल झालेले असल्याचे दिसून येत आहे

Post a Comment

0 Comments