Header Ads Widget

बरबडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत लाखो रुपये खर्च करून बांधले परंतु लाइटिंग केली नसल्यामुळे बनली शोभेची वस्तू आरोग्य विभागाने लक्ष द्यावे - मागणी -

         माधव पवार
बरबडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत लाखो रुपये खर्च करून बांधले परंतु लाइटिंग केली नसल्यामुळे बनली शोभेची वस्तू नको आरोग्य विभागाने लक्ष देऊन रुग्णाच्या सेवेत देण्याची मागणी या विभागातील जनतेसह रुग्णाणानी केली आहे 
आरोग्य विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आली परंतु आरोग्य विभागाने नूतन इमारती मध्ये लाइटिंग केली नसल्यामुळे जनतेसह रुग्णाच्या सेवेपासून अजून किती महिने वंचित राहणार असा प्रश्न जनसामान्य माणसाला पडला आहेसदरची लाखो रुपयाची इमारत रंगरंगोटी करून रुग्णाच्या सेवेत सज्ज झाले असली तरी लाइटिंग केले नसल्यामुळे रुग्णाला जुन्या इमारतीमध्येच उपचार घ्यावे लागत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहेबरबडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत चार आरोग्य उपकेंद्र आहेत आणि बरबडा गावची लोकसंख्या ही पंधरा ते सोळा हजारा पेक्षाही जास्त असताना सुद्धा आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे सदरची लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेली इमारत धूळ खात राहणार की रुग्णाच्या सेवेत येणार असा ही सवाल केला जात असला तरी वरील इमारत ही जुन्नी आहे

सदरच्या दवाखान्याची इमारत रुग्णाच्या सेवेत येत नसल्यामुळे येथील असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह रुग्णाला जुन्या इमारतीमध्येच उपचार करावे लागत असल्यामुळे सदरच्या इमारतीची आरोग्य विभागाने तात्काळ लाइटिंग फिटिंग करू रुग्णाच्या सेवेत द्यावे अशी मागणी या विभागातील जनतेतून केली जात आहे 

Post a Comment

0 Comments