नायगाव गगणबीड ता नायगाव येथील प्रसिद्ध महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त शिवलीलामृत या ग्रथाचे पारायण करण्यात आलेतालुक्यातील मौजे गंगनबीड येथे शिवरात्रीच्या महोत्सवामुळे या मध्ये १५१ भक्त गणांनी सहभाग नोंदवून माधव गणेश आलेवाड सहशिक्षक लालवंडी यांच्या तर्फे दरवर्षी हा संकल्प या महाशिवरात्री च्या दिवशी राबवण्यात येतो
आलेवाड व संयोजन समिती ने आयोजित केलेला पारायण सोहळा भक्त गणांनी यशस्वी केला मुख्य वाचक म्हणून हरिभक्त दामोधर मारोती जाधव पाटील लालवंडीकर यांनी सूत्र सांभाळली सर्व भक्त गणांना या वेळी शिवरात्री निमित्त महाप्रसाद ही देण्यात आला.
यात्रा संयोजन समिती ने केलेल्या नियोजना मुळे भक्त गणांनी व्यवस्थित दर्शनाचा लाभ घेतला अनेक भक्त गणांनी महाप्रसादा साठी देणगी देऊन भंडारा साठी दान दिले.

0 Comments