Header Ads Widget

आईच्या चितेला मुलीनेच दिली अग्नी धूपा येतील अनुसयाबाई हनमंते यांचे झाले होते निधन! इतकेच मला जातांना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

     

     माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे धूप्पा येथील रहिवासी असलेल्या जेष्ठ नागरिक महिला स्व.अनुसयाबाई मरीबा हनमंते यांचे दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ४ ते सव्वा चार वाजण्याच्या दरम्यान वयाच्या ७५ व्या वर्षी झाले होते

धूप्पा येथे दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी २ वाजता धुप्पा या गावांत अनुसयाबाई हनमंते यांच्या चित्तेला अग्नी देण्यासाठी स्वतःच्या मुलीनेच अग्नी दिली असल्याचे तालुक्यातील पाहिलीच घटना मानली जात आहे 

नायगाव फास्ट न्यूजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली !

तालुक्यातील मौजे धूप्पा येथील रहिवासी असलेल्या स्व.अनुसयाबाई मरीबा हनमंते या मातोश्रीला मुलगा नसल्यामुळे आईच्या चित्तेला अग्नी देऊन मुलीनेच मुलाची जबाबदारी पाळली असल्यामुळे सदरच्या अंत्यविधीच्या ठिकाणी सर्व  गहिवरून गेल्याचे असल्याचे चित्र स्पष्ट पाहवयास मिळाले आहे 

आधुनिक युगातही 'मुलगा हाच वंशाचा दिवा' हा बुरसटलेला विचार झटकून 'मुलगी हीच वंशाची पणती आहे  हा विचार समाजात रुजविला पाहिजे कारण धूप्पा येथील आईच्या चित्तेला मुलीने अग्नी देऊन वास्तव संदेश दिला आहे

म्हणून इतकेच मला जातांना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते ? मी ऐकवली तेव्हा ही तुज माझी हीच कहाणी मी नाव तुझे तेव्हा ही चुपचाप वगळले होते याचेच रडू आले

की रडणे न मला रडणे ही मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते


Post a Comment

0 Comments