शिवजन्मोत्सवानिमित्त शिवाजी महाराज की जय म्हणत मा.जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे यांनी मुलासोबत सायकलवर काढली रॅली काढून जय घोष केला आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव मुखी येताच लाखो लोकांच्या अंगावर क्षारे उमटतात अशा महापुरुषांच्या जन्मोत्सवा निमित्त नरसी जिल्हा परिषद गटाचे विद्यमान मा. जिल्हा परिषद सदस्य व भाजपाची बुलंद तोफ माणिकराव लोहगावे यांनी शिवजन्म महोत्सवाच्या कार्यक्रमा निमित्त लहान मुलासह स्वतः सायकलवर रॅली काढली असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे
नायगाव तालुक्यातील नरसी जिल्हा परिषद गटाचे विद्यमान मा. जिल्हा परिषद सदस्य माणिकराव यांच्या समयोत लहान मुलांनी सुद्धा सायकलवर भगवा बांधून शिवाजी महाराज की जय अशा घोषणा व गर्जना करीत रॅलीत सहभाग घेतल्याचे चित्र दिसून आले आहे
दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी माँ जिजाऊ साहेब यांचे सुपुत्र शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र जयंती सोहळे साजरे करण्यात आले आहे
तालुक्यातील नरसीचे मा. जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगाव यांनी जेव्हा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने शिवरायांचे छोटे छोटे मावळे घेऊन रॅलीत सहभाग घेतला व महाराष्ट्राच्या तमाम जनतेला शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा देत जयंती सोहळ्याचा संदेश दिला आहे
अशा या ग्रामीण पुढाऱ्यांचे तमाम जनतेतून कौतुक करण्यात येत असले तरी सदरचा नेता हा जनसामान्य माणसासह लहान बालकात ही मन मिळून राहतो आणि शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने सायकलवर भगवे बांधून शिवरायांचा जयघोष करतो आहे

0 Comments