नायगाव खैरगाव येथील ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने १७ फेब्रुवारी रोजी शुक्रवारी ठेवण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला विविध मान्यवरांना निमंत्रित करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला असून या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात प्रथम गणेश वंदना गीताने करण्यात आली आहे.
खैरगाव तालुका नायगाव येथील ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूलचे सचिव कुमुदकांत पटेल यांच्या नियोजनातुन पार पडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात याच शाळेतील चिमुकल्या बाल कलाकारांनी विविध सामाजिक लोकजागृती ,व देशभक्तीपर सुंदर अश्या विविध गीतांवर नृत्य सादर करून आपल्या अंगात असलेली कला प्रेक्षकांच्या समोर मांडली आहे
लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांनी व गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अक्षरशः शाळेचे प्रांगण भरगच्च असा भरलेला होता. जवळजवळ तिन ते चार हजार प्रेक्षकांनी या कार्यक्रमांचा आस्वाद घेतला आहे. तर दुसरीकडे मात्र स्वतःच्या मुलांचे सुंदर असे नृत्य पाहून अक्षरशः पालक वर्ग भारावून गेले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक विविध गीते सादर केली असून त्यात प्रथम गणेश वंदना गीत, चंद्रा लावणी, कोळीगीत, गाडीवाला अया घरसे कचरा निकाल, झुमका वाली पोर, देशभक्तीपर गीत, झिंग झिंग झिंगाट, असे बहारदार गीते सादर करण्यात आली आहे
यावेळी टाळ्याच्या कडकडाटाने परीसर दणाणून गेला होता. लहान मुलात किती कला गुण लपलेले आहेत याचे प्रत्यक्ष दर्शन या सांस्कृतिक कार्यक्रमातून पालकांना व प्रेक्षकांना दिसून आले आहे.
लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी पालक वर्ग व गावातील मान्यवर मंडळी , तरुण व महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
ग्रीन व्हॅली इंटरनॅशनल स्कूल मध्ये अतिशय नियोजनबद्ध सुंदर असा संस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल शाळेचे संस्थाचालक गंगादास पटेल, सचिव कुमूदकांत पटेल, मुख्याध्यापिका सौ.सरोजा धरणे,सहशिक्षक अर्जुन बैस, आनंद पांचाळ, नवनाथ वरवटे, विठ्ठल पांचाळ, आशिष मोकाटे, हणमंत हांडे, माधव भेदेकर, नागनाथ तेलंगे, गणेश पाटील, बालाजी डोंगरगावे, आदी शिक्षक, शिक्षिकांचे प्रेक्षक,पालकांच्या वतीने सर्व स्तरातून मोठे कौतुक होत आहे.

0 Comments