Header Ads Widget

शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची बूट घालून पूजा करणाऱ्या कंत्राटी ग्रामसेवकाला तात्काळ निलंबीत करण्याची मागणी

विशेष प्रतिनिधी  : बाळासाहेब पांडे :- 
शेळगाव छत्री येथे वादग्रस्त ठरलेले सध्या अंचोली ता नायगाव येथे कार्यरत असलेले  वादग्रस्त व कंत्राटी ग्रामसेवक रामेश्वर मुदखेडे : यांनी चक्क बुटासह शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतांनाचा फोटो समाज माध्यमातून व्हायरल झाल्याने नायगाव  तालुक्यात शिवप्रेमी मध्ये तिव्र संतापाची लाट पसरली  आहे 

अश्या बेजबाबदार बेताल वक्तव्याने नेहमी वादात अडकणार्या या महाशयांना निलंबीत करण्याची भावना शिवप्रेमी मावळ्यांनी नायगाव फास्ट न्यूज बोलताना व्यक्त केली आहे.
नायगाव तालुक्यात औराळा येथे  ग्रामपंचायतच्या अनियमितता व अर्थिक अपहार प्रकरणात दोषी असलेले आणि आपल्या वाचाळपणामुळे नेहमी वादग्रस्त ठरलेले हे ग्रामसेवक एकदा एका महिलेने यास डाँ हेडगेवार चौकात चपलेने श्रीमुखात मारल्याची घटना घडली होती.सध्या अंचोली ता. नायगाव येथे कंत्राटी ग्रामसेवक असलेले रामेश्वर मुदखेडे यांनी असे अनेक पराक्रम केले आहेत.
असाच एक पराक्रम दि. १९ रोजी रयतेचे राजे शिवराय यांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतांना त् पायातील बुट काढण्याचेही भान राखले नाही. बुट पायात ठेवून पुष्पहार अर्पण केल्यानंतर स्वतःच फोटो समाजमाध्यमातून व्हायरल केला. हा फोटो व्हायरल होताच शिवप्रेमीत प्रचंड असंतोष व्यक्त करण्यात येत असून, अनेक शिवप्रेमीनी मुजोर ग्रामसेवकाला फोन करुन त्याच्या कुळाचा उध्दार केला आहे.तर काहींनी या बेजबाबदार वर्तणूक करणाऱ्या ग्रामसेवकाने केलेले पराक्रम लक्षात घेता गटविकास अधिकारी एल आर वांझे काय कार्यवाही करणार या कडे शिव प्रेमीचे लक्ष लागले आहे.
-------------------------------------------------------------------
 "" बेताल  ग्रामसेवकाची  याचना माफीची नाही 
खवळलेल्या मावळ्यांची मागणी निलंबनाची ! ""

या घोडचूकीला सावरण्या साठी  एक आँडीओ क्लिप व्हायरल करुन झाल्या प्रकाराबद्दल माफी मागताना हा चुकून प्रकार घडल्याचे कबुली जबाब या बेताल बेजबाबदार महाशयाने दिला असला तरी शिवप्रेमी शांत बसायला तयार नसून ग्रामसेवकाला असे वर्तन शोभत नसल्याने त्यांना निलंबित करण्याची मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments