महाराष्ट्राचे आराध्य दैवत तथा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती
भारतातच नव्हे तर सात समुद्राच्या पलीकडे असलेल्या दुबई या देशात शिवरायाचा जन्मोत्सव भव्य दिव्य साजरा करण्यात आला आहे
दुबईमध्ये एम पी एफ एसच्या वतीने भव्य दिव्य असा " शिव जयंती सोहळा तमाम शिवप्रेमी आणि बाल कानी आणि गोपाळांच्या उपस्थितीत मोठया आनंदाने साजरा करण्यात आला असल्यामुळे महाराष्ट्राच्या तमाम जनतेसाठी अभिमानाची बाब आहेमाँ जिजाऊ साहेबाचे सुपुत्र शिवछत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीच्या निमित्ताने मान वंदना देताना मुलांनी महाराष्ट्राचा रांगडा, कणखर बाणा जपत, संस्कृती आणि परंपरेचा सुरेख मिलाफ घालत आपल्या कला गुणांच्या माध्यमातून शिवकालीन इतिहासातील एक एक पान जिवंत केले आहे
सभासदांच्या आणि प्रेक्षकांच्या प्रचंड उत्साही प्रतिसादात सकाळी १० वाजता "संयुक्त अरब अमिराती" आणि "भारताचे" राष्ट्रगीत सभागृहात वाजवण्यात आले.मंडळाचे खजिनदार सुमेय ह्यांनि आपल्या मधुर बासरी वादनाने कार्यक्रमाचे वातावरण निर्मित केली असून एम पी एफ एसचे अध्यक्ष देवेंद्र लवाटे ह्यांनी कार्यक्रमाची सूत्रे हाती घेतली होती

0 Comments