Header Ads Widget

" अ हो काय सांगता राव " राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी निवडणूक आयोगाला पत्र दिले म्हणे !!

      माधव पवार
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्या सोबत बोलणे झाल्याच्या नंतर एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकार सहमत असल्याचे पॉझिटिव्ह बोलले असले तरी "अहो काय सांगता राव " मुख्यमंत्री शिंदे यांनी निवडणूक आयोगाला विध्यार्थीसाठी पत्र दिले म्हणे असे मुख्यमंत्र्यानी सांगितल्यामुळे ग्रामीण भागात जोरदार चर्चा चालू आहे 
लोकसेवा आयोग हे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे विभाग असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की एम पी एस सीच्या विध्यार्थीसाठी निवडणूक आयोगालाच पत्र दिले असल्याचे सांगितले आहे

लोकसेवा आयोग व निवडणूक आयोग या मध्ये अस्माणचा फरक असताना सुद्धा मुख्यमंत्र्यानी बोलण्यावर लक्ष केंद्रित केले नसल्यामुळे कमालीची चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे
एम पी एस सीच्या विध्यार्थीचे निवडणूक आयोगाकडे कोणते काम ? असेल असा प्रश्न चर्चेचा विषय बनला असून सदरचे पत्र लोकसेवा आयोगाकडे दिले असल्याचे सांगितले आहे

तर विद्यार्थ्यांना ही समाधान वाटले असते या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसेवा आयोग आणि निवडणूक आयोग यातील फरक जाणून घेतले तर बरे झाले असते सदरच्या होत असलेल्या चर्चेतुन बोलल्या जात आहे 

सध्या राज्यात निवडणूक आयोगांचं घोड सध्या मोकाट दौडत असल्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यानी सुद्धा निवडणूक आयोग असा उल्लेख केला असला तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा निवडणूक आयोगाला बोलले म्हणे काय कमाल हाय एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना निवडणूक आयोगाचा काय संबंध येतो असाही प्रश्न चर्चेला जात आहे



Post a Comment

0 Comments