Header Ads Widget

पोलीस अधीक्षकात व द्वारकादास चिखलीकरात शाब्दिक चकमक झाल्याची चर्चा ? मग तर बदली आश्चर्य कारक

       माधव पवार 
गुन्हेगाराचा गर्दनकाळ ठरलेले एलसीबीचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यातील विविध गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद करण्यासाठी कसून चौकशी करत आरोपीच्या मुस्क्या आवळल्या आहेत अशा पोलीस अधिकाऱ्यांची बदली नुकतीच आचार्य कारक झाली होती
सदरची बदली रद्द करण्यात आल्याच्या नंतर पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना एलसीबी मध्येच पाठवण्यात आले परंतु पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी कामावर रुजू करून घेतली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे बदली रद्द झाल्याच्या नंतर नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे जॉइनिंग होण्यासाठी एलसीबीचे  पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी गेले होते

 परंतु पोलीस अधीक्षक रुजू करून घेतले नसल्याने पोलीस अधीक्षकात व द्वारकादास चिखलीकरात शाब्दिक चकमक ( बातचीत ) उडाली असल्याची मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात चर्चेला उधाण आले होते

सदरच्या पोलीस अधिकाऱ्यांना नांदेड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकाने तात्काळ रुजू करून घेऊन एलसीबी मध्ये पाठवून दिल्यास अनेक लिस्टवर असलेल्या गुन्हेगाराच्या मुस्क्या अवळतील अशी अपेक्षा जनतेनी केली आहे 

Post a Comment

0 Comments