जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्याचे आदेश वरिष्ठ पातळी वरुन काढण्यात आले असल्यामुळे नायगाव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांची बदली धर्माबाद पोलीस ठाण्यात करण्यात आल्याचे आदेश जारी करण्यात आले आहे
धर्माबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हिबारे यांची बदली औरंगाबादला करण्यात आले असल्याचे आदेश प्राप्त झाले आहे
नायागांव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे दमदार फौजदार खाकी म्हणजे काय असते हे गेल्या दोन ते अडीच वर्षा पासून कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दाखवून दिले अशा पोलीस अधिकाऱ्याची म्हणजे फौजदार दिनेश येवले यांची बदली कुंडलवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे
नायगाव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष फौजदार बाचावार यांची बदली कुंटूर येथे करण्यात आली तर देगलूर येथून पोलीस उपनिरीक्षक घनश्याम वडजे हे नायगावला येणार असल्याची माहिती मिळते आहे
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे
सदरच्या पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीचे आदेश जिल्हा दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी काढले असल्यामुळे धर्माबादला पोनि अभिषेक शिंदे पोनि संजय हिबारे यांची औरंगाबादला तर कुंटूरला फौजदार बाचावार तर कुंडलवाडीला फौजदार दिनेश येवले आणि नायगावला फौजदार घणश्याम वडजे तर हिमायतनगर येथून सपोनि महाजन धर्माबादला या पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्या करण्यात आल्या आहेत

0 Comments