Header Ads Widget

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांच्या शिवसेनेची २१फेब्रुवारी रोजी विशेष बैठकीचे आयोजन - गंगाधर बडूरे यांची माहिती

        माधव पवार
आगामी काळातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांच्या शिवसेनेची दिनांक २१ फेब्रुवारी २०२३ रोजी कृष्णर येथील एम आय डी सी समाधान हॉटेल कुषणूर येथे दुपारी ४ वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा सहसंपर्क प्रमुख गंगाधर बडूरे यांनी दिली आहे 
तालुक्यातील नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असलेल्या कृष्णूर एम आय डी सी अंतर्गत असलेल्या समाधान हॉटेल येथे सदरील बैठकीचे आयोजन करण्यात आले असले तरी मूळ गाभा म्हणजे नुकतेच निवडणूक आयोगा कडून धनुष्यबाण व शिवसेना हे नाव मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे गटाला दिल्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आले आहे 

आघामी काळातील निवडणुका जिंकण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असल्यामुळे दिनांक २१  फेब्रुवारी २०२३ रोजी कुष्णुर येथील समाधान हॉटेल मध्ये तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्याची बैठक घेण्यात येणार आहे

या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, उपनेते तथा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव हे उपस्थित राहणार असल्याने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे जिल्हा सहसंपर्क प्रमुख गंगाधर बडूरे यांनी केले आहे 

कृष्णुर येथील आयोजित केलेल्या बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, आनंदराव बोढांरकर यांच्यासह आदी मान्येवर उपस्थित राहणार आहे

पुढील काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संदर्भात विचार विनिमय या बैठकीत होणार असल्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सायंकाळी ४  वाजता कुष्णूर येते उपस्थित राहावे असे सहसंपर्क प्रमुख व प्रल्हाद पिंपळे उपजिल्हाप्रमुखानी यांनी केले आहे

 

Post a Comment

0 Comments