Header Ads Widget

संत गाडगेबाबाची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करावी - जिल्हाध्यक्ष मावले यांचे प्रतिपादन


             मारोती इबितवार
महाराष्ट्रातच नव्हे तर अख्या जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांच्या विचाराला अभिवादन करून नायगाव तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात संत गाडगेबाबाची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली आहे
याच कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष माऊले यांनी संत गाडगेबाबा यांच्या जयंती सोहळ्याच्या दरम्यान प्रतिपादन केले आहे 

संत गाडगेबाबाची जयंती वैचारीक वैचारिक स्वरूपात जयंती साजरी करावी असे मत ही जिल्हाधक्ष मावले यांनी नायगाव तालुक्यातील मौजे सुजलेगाव येथे आयोजित केलेल्या जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलत होते
नायगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात विविध उपक्रमांनी राष्ट्रसंत गाडगेबाबाची जयंती साजरी करण्याचे ही यावेळी आवाहन करण्यात आले आहे 

धोबी समाज राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे प्रदेशाध्यक्ष कैलास तेलंग टेभूर्णीकर जिल्हाधक्ष गंगाधर मावले  सचिव दत्ता भाऊ येवले बिलोली तालुकध्यक्ष रोहित ब्यागलवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सुजलेगाव येथे शाहीर दिगू तुमवाड यांनी गावात व्याख्यान,ग्रामसफाई ,महाप्रसाद, नायगाव येथे सफाई कामगारांचा सन्मान,नरसी जिगळा येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे

कुंडलवाडी येथे ग्रामसफाई ,गुणवंतांचा सत्कार व महाप्रसाद , देगलूर येथे समाजसेवका़चा सन्मान व महाप्रसाद अशा अनेक ऊपक्रमांनी संपूर्ण जिल्ह्यात बाबांची जयंती साजरी करण्यात आली आहे 

Post a Comment

0 Comments