Header Ads Widget

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून घुंगराळा ते बळेगाव रुई रस्ता मार्गी लावणार - शिवराज पाटील होटाळकर -

      माधव पवार
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून नायगाव तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्ता मार्गी लावणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नांदेड तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितले आहे

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई रस्ता हा गेल्या अनेक वर्षा पासून प्रलंबित असल्यामुळे या विभागातील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे

या भागातील जनतेची व वाहन धारकांची गैरसाय टाळण्यासाठी व जनहितार्थ सदरचा प्रश्न असल्यामुळे नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून शक्यतो लवकरात लवकर मार्गी लाववू असे शिवराज पाटील होटाळकर यांनी सांगितले आहे

नायगाव तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्ता हा चार ते पाच तालुक्याला जोडला असल्याने या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाची बसेस सुद्धा रस्त्या अभावी बंद आहेत

या रस्त्याला जोडलेले तालुके म्हणजे उमरी धर्माबाद मुदखेड भोकर आणि नायगाव ह्या लोकांना येण्या-जाण्यासाठी व दळण वळणासाठी अतिशय सोपा आणि सरळ मार्ग असल्यामुळे हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे

सध्याच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नांदेड तथा माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर हे प्रयत्न करणार आहेत

Post a Comment

0 Comments