Header Ads Widget

जिवावर बेतला डी जे लग्नाच्या वरतीत सुपर डॉन्स करणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने पारडी गावात मृत्यू -? -

       माधव पवार
जयंती सोहळा असो की लग्न सोहळा असो अशा कार्यक्रमात डीजे वाजल्याच्या नंतर अनेकांच्या पायात मुंग्या येतात आणि लहान असो मोठा व्यक्त किंवा तरुण वर्ग डीजेच्या तालावर छान पैकी नाचत असतात परंतु एक धक्कादायक घटना समोर आली आहे
सदरच्या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने डीजेच्या तालावर वरात काढण्यात आली वरती मध्ये एक तरुण बे बहाण होऊन नाचत असताना त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली असल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यात असलेल्या शिवणी गावातील रहिवासी असलेल्या विश्वनाथ जानगेवाड याचा लग्नाच्या वराती मध्ये एक तरुण डीजेच्या तेलगू गाण्यावर डॉन्स करीत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यातच नाचता नाचता एकदम जमिनीवर पडून जाग्यावर मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येते

लग्न सोहळ्यातील डॉन्स त्या तरुणाच्या जिवावर डीजे बेतला की काय ? असी चर्चा होताना ऐकावयास मिळत असून सदरचा सुपर डॉन्स करणारा लग्नाच्या वरतीचा आंनद घेत असताना त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे 

Post a Comment

0 Comments