नायगाव तालुक्यातील बळेगाव बंधारा हा शेतकऱ्यांच्या हितासाठी बांधण्यात आला आल्यामुळे सदरील बंधाऱ्याचे थेट पाणी कोलंबी पर्यंत जात असल्याने त्या पाण्याचा परिपूर्ण उपयोग या विभागातील शेतकरी बांधव घेत आहेत
ह्या बंधार्यांचा फायदा रुई परिसरातील शेतकऱ्यांना जरी नसला तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यानी वंजारवाडी फाट्यावर जवळ पाण्याचा एअर काढण्यासाठी वॉल खुला केल्यामुळे त्या पाण्याचा फायदा अनेक शेतकरी घेत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहेमहाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या माध्यमातून नायगाव विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन माजी आमदार तथा दिवंगत बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी सदरचा बंधारा मंजूर करून घेण्यासाठी पाठपुरावा केला होता
बळेगाव बंधाऱ्याच्या पाण्याचा फायदा आजच्या परिस्थितीत कोलंबी पर्यंत पाणी नेण्याचे काम स्व. बळवंतराव चव्हाण यांचे सुपुत्र नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी केले असल्यामुळे सदरच्या या विभागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे
स्व.शंकरराव चव्हाण यांच्या माध्यमातून स्व बापूसाहेब देशमुख गोरठेकरानी बळेगाव बंधारा मंजूर करून घेतला "अन "मा.आ वसंतराव चव्हाणानी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणा यांच्याकडे कोलंबी पर्यंत पाणी नेण्यासाठी पाठपुरावा केला आहे
तालुक्यातील बळेगाव बंधाऱ्याच्या पाण्यामुळे या विभागातील शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न काढता येते सदरची पाईप लाईन टाकण्यासाठी संबंधित विभागाला तीन ते चार वर्ष लागले परंतु या पाण्याचा उपयोग बऱ्याच पैकी गावाला नसल्यामुळे एकंदरीत शेतकरी नाराज असला तरी कोलंबी पर्यंत सदरचे पाणी गेल्याने या विभागातील शेतकऱ्यांना बळेगाव बंधाऱ्याच्या पाण्याचा मोठा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे

0 Comments