Header Ads Widget

जगण्याची वाट प्रशस्त करणारा आदर्श माणूस सुधाकरराव कुलकर्णी चोराखाळीकर गुरूजी


नायगाव फास्ट न्यूज : विशेष लेख  प्रकाशित !!                          

जिथे दिव्यत्वाची प्रचीती तिथे  कर माझे जुळती अशी
ज्यांची वागण्याची बोलण्याची व वर्तणुकीची ख्याती आहे ते म्हणजे माझे पितृतुल्य मेव्हणे तथा एक आदर्श शिक्षक व शांत संयमी विविध कला- गुणांचा खजिना असणारे , परिसा सम असणारे प्रत्येकाच्या जीवनाचे सोने करणारे साखरे हून ही गोड असणारे

व्यक्तिमत्व,वाखाणण्याजोग कृतत्व, इतरांवर अपार प्रेम करणारे दातृत्व आमचे मेव्हणे सुधाकरराव हाणमंतराव कुलकर्णी चोराखळीकर यांच्या पासष्टी निमित्त आज दि.१२ फेबुरवारी रविवार रोजी  तुलाभार , सत्कार सोहळा मी पाहिलेले कुलकर्णी सर हा कार्यक्रम साजरा होत आहे.या अनुषगाने त्यांच्या जीवन पटावर प्रकाश टाकणारा हा लेख.
    
आप्पासाहेब कुलकर्णी या नामवंत दरबारी गायक असलेल्या व ४० वर्ष पोलीस पाटील  असलेल्या वतनदार कुलकर्णी घराण्यात  चोराखळी ता. कळंब. जि. उस्मानाबाद येथे सुधाकर हणमंतराव कुलकर्णी यांचा जन्म २७ जून १९५८ रोजी हणमंतराव कुलकर्णी व जाण्हवीबाई यांच्या उदरी झाला. सुधाकरराव कुलकर्णी यांचे वडील पोस्ट  कार्यालयात कर्मचारी तर त्यांचे काका आनंतराव व रमाकांतराव प्रशासन 
विभागात ग्रामविकास अधिकारी पदावर नौकरी करणारे, सुधाकरराव यांना लहानपणापासूनच प्रशासकीय 
नौकरी करावी अशी आवड होती.
त्यांना दोन लहान भावंडे त्या मध्ये मधुकर व दिनकर, तर चुलत भावंडे अर्धा डझन म्हणजे सहा त्यातील एक काळाच्या झडप आल्याने मृत्यू पावला, या सर्वात एकच लाडकी भगिनी जयश्री प्रकाश पाटील तेरखेडकर ,सर्व कटुंबियाची वागण्याची पद्धत म्हणजे विनोदी जीवनाची शैली आवलंबीत खेळीमेळीचे वातावरणात जीवन जगण्याची पद्धत एक आदर्शवृत कटुंब असल्याची जाणीव संपूर्ण ग्रामस्थ व सगे सोयरे यांना प्रचित होती.त्या मुळे सर्व जन एक आदर्श कुटुंब म्हणून यांच्याकडे पहातात! 
 
सुधाकरराव यांनी डी.एड. ची पदवी घेतली व त्यांना प्रशासनाने कॉल केला  आणि त्यांच्या नोकरीची  शिक्षक म्हणून  सुरुवात दिनांक १५ फेब्रुवारी १९८२ रोजी   प्रा.शा. नांदगाव ता. लोहा येथून झाली.

येथे साडे चार महिने त्यांनी नोकरी केली.नंतर त्यांची बदली दि.९ जुलै-१९८२ ला होटाळा ता.बिलोली येथे झाली.  ते १३ नोव्हेम्बर १९९५ =पर्यंत म्हणजे एक तप व एक वर्ष म्हणजे १३ वर्षे प्रा. शा. होटाळा ता. नायगाव खै.येथे ग्रामस्थ व विदयार्थी प्रिय म्हणून कार्यरत होते.

होटाळा येथे त्यानी विद्यार्थ्यांना ज्ञान दाना बरोबरच सर्वांगीण विकासा साठी सांस्कृतिक क्रीडा व इंग्रजी विषयाचे दिलेले ज्ञान हे अनेक विद्यार्थी घडविण्यात बहुमोलाचे ठरले.ते गावातच राहून विद्यार्थी घडविण्यात रममाण झल्याने गावकऱ्यांना ते आपले वाटू लागले.

होटाळा  येथील रहिवाशी सह शिक्षक ताटे गुरुजी व शाळेचे मुख्याध्यापक शेख सर गोधमगावकर,जेष्ठ शिक्षक देशमुख सर व गुरुपवार तत्कालीन सरपंच दता पाटील  यांनी पुढाकार घेत मांजरम येथील वतनदार रघुनाथराव पांडे यांची कन्या पदमावती यांच्या सोबत त्यांच्या सोयरिकीचा योग जुळून आणला व विवाह सोहळा पार पडला त्या मुळे त्यांचे व या भागातील पांडे परिवार यांचे नाते जुळले व त्यांचे व पांडे मित्र परिवार यांचे प्रेम वृद्धिंगत होत गेले.
 
होटाळा शाळेच्या रंग रगोटी सह शाळा स्वच्छ करणे, म्हणी लिहणे, विविध प्रमानबद्ध नकाशे काढणे,  शाळा सुधारण्या साठी प्रयत्न करणे, या सह गावातील ग्रामस्थांना योग्य मार्गदर्शन देत गावात राहून गावकऱ्यांचे सामाजिक धार्मिक,व सांस्कृतिक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेत विकासासाठी प्रयत्न करणे या मुळे गावकऱ्यांना सुधाकर कुलकर्णी सर आपले वाटू लागले.या सर्व कामाची दखल घेत तात्कालिन शिक्षणाधिकारी नांदेडे व शिक्षण विभाग यांनी अतिरिक्त वेतन वाढ देत त्यांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव केला.त्यांचे नियत मानाने बदली होण्याचा प्रसंग अनेक वेळा आला गावकरी त्यांना सोडत नव्हते.अनेक वेळा रद्द झालेली बदली १३ वर्षानंतर अखेर झाली.
 
लगतच्याच नरसी या केंद्रीय प्रा.शाळेत   त्याची बदली झाली. नोव्हेम्बर १९९५- ते मार्च- पर्यंत ते मु.अ.गोपाळराव
पारळकर सर व माधवराव शिंदे यांच्या सह अनेक मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या मदतीने शिक्षण व गुरुजी वर्गाच्या सर्व बिले काढणे व इतर तांत्रिक कामात हातखंडा ठेवत इंग्रजी विषयाचे तज्ञ शिक्षक म्हणून जिल्ह्यात नाव कमावले.अधिकारी शिक्षक व सर्वांच्या मनावर त्यांनी अधिराज्य केले. व सेवांतर्गत बीएड पदवी प्राप्त केली.के. प्रा.शाळा- नरसी  येथे पाच वर्षे सेवा केल्या नंतर पदोन्नती वर त्यांची बदली

मार्च २००० मध्ये लोहगाव ता.बिलोली येथे तत्कालीन जि.प.अध्यक्ष शिक्षण सभापती बाबाराव एंबडवार यांनी आपल्या विभागाची शाळा सुधारावी म्हणून केली.त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना जिल्हा स्तरीय गुरूगौरव पुरस्कार ही  देण्यात आला.त्यांच्या जडणघडणीत त्यांचे पत्रकार असलेले मेव्हणे बाळासाहेब पांडे मांजरमकर यांचे वेळोवेळी सेवा करण्याचे भाग्य  लाभले. 

वडीला सारखे प्रेम लावीत बाळासाहेब पांडे यांच्या शिक्षणासह  नौकरी व वैवाहिक जीवन घडविणारे सुधाकरराव कुलकर्णी यांच्या परिसासम जीवन मूल्याने बाळासाहेबांचे जीवनाचे सोने झाले.त्यांच्या या बहुमोल मार्गदर्शनात वाढलेल्या बाळासाहेब पांडे यांचा नावलौकिक वाढला तो केवळ कुलकर्णी सरांच्या प्रेम व त्यागामुळे.त्याचा उपयोग लोहगाव येथे आलेल्या शैक्षणिक अडचणीत त्यांना अनेकवेळा झाला.

लोहगाव येथे दहावीच्या वर्गापर्यंत दिलेले इंग्रजी विषयाचे व्याकरणा साहितचे ज्ञान हे अनेक विद्यार्थी उच्च पदस्थ घडविण्या साठी उपयोगी ठरले दि. ३० जून २०१६ (माध्यमिक शिक्षक)  या पदावर १७ वर्षे सेवा करीत नियत वयो मानाने ३५ वर्ष सेवा करीत त्यांची सेवानिवृत्ती लोहगाव ता बिलोली येथूनच झाली.ग्रामस्थ व शालेय प्रशासन यांनी मोठ्या थाटात व दिमाखदार सोहळ्याने त्यांची सेवपूर्ती गौरव सोहळ्याची सांगता केली.

मुलांना जवळ घेणे, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ,त्यांची परिस्थिती समजून घेणे आणि त्यांच्यात मिसळून बालक होऊन जाणे हे त्यांना सहज जमायचे.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा  भाव आणि त्यांचा चेहरा वाचन करून त्यांच्या मनातलं ज्याला ओळखता येत तो शिक्षक  आधारवड असतो असं अनेक मुलांचा आधारवड होण्याचं पुण्य कुलकर्णी सरांच्या माथी आहे.

सुसंस्कारित शिक्षक म्हणजे शिस्त ,क्षमता व कर्तव्य यांची जाणीव यांचे मूर्तिमंत उदाहरण असलेले सुधाकरराव कुलकर्णी सर यानी समाजाबरोबरच विद्यार्थ्यांना ज्ञान दान देत आपले कुटुंब ही सुधारले

त्यांना असलेल्या तीन मुली व एक मुलगा,पहिला मुलगा , दुसरी मुलगी अनुपमा यांचे जीवन घडविले,  त्यांना  जुळ्या मुली झाल्या .त्या गीतांजली व स्वरांजली याना मुला सारखे प्रेम देऊन दोघींना ही उचशिक्षित करीत नोकरी लावली . त्यासम उचशिक्षित आदित्य तारे व सुशील देशपांडे जावाई लाभले. 

आपला शिक्षण क्षेत्रातील ज्ञान दानाचा वारसा चालू ठेवण्यासाठी मुलगा परीक्षित यास शिक्षक बनवले तो आज माळकोठा जि.प.हा.येथे इंग्रजी विषयाचे वडीला च्या पावला वर पाऊल ठेवत त्यांचा सम ज्ञानदान करीत आहे.तर त्याच्या मुलाची पत्नी...रुपाली ही रांजनी  घनसांगवी तालुका जालना जिल्हा येथे शिक्षक पदावर नोकरी करीत आहे.
आता सेवनिवृत्तीचा काळ यशनगरी नांदेड दोन च्या नगरीत पत्नी पदंमा उर्फ अनुराधा सोबत व यश नगरी कर च्या सानिध्यात सामाजिक व धार्मिक कार्यात सहभागी होऊन आपल्या कुटुंबात  पूर्णवेळ घालवत असताना त्यांना हृदय विकाराने ग्रासले वैद्यकीय सेवेत तज्ञ असलेले जेष्ठ जावई मुकुंदराव देशमुख धानोरकर यांच्या मर्गदर्शनाखाली डाँ कार्लेकर यांनी केलेल्या बहुमोल मार्गदर्शना ने त्यांच्या वर बाय पास ही शस्त्रक्रिया झाली.

आता ते आपले जीवन जगताना कुटुंबियाची जवाबदारी मुलांकडे देऊन  केवळ नातवंडे याची सेवा व धार्मिक कामात आपल्या बहुमोल ज्ञानाचा समाजाला उपयोग देत जीवन जगत आहेत.सर्व नातवंडामध्ये ते रममान झाले आहेत. मल्हारच्या येण्याने तर त्यांच्या जीवनाला  नवा हुरूप, उमेद मिळाली.पुत्रवत प्रेम करणारे जावई मुकुंद देशमुख धानोरकर, आदित्य तारे उमरखेडकर,सुशील देशपांडे लातूरकर,यांच्या मुळे त्यांच्या जीवनाला उभारी मिळाली आहे.

आज त्यांच्या वयाला पासष्टी झाली. या निमित्ताने त्यांच्या जीवनावर टाकलेला हा प्रकाश.त्यांच्या भावी जीवनास पांडे परिवार मांजरंमकर च्या वतीने मनस्वी शुभेच्छा पुढील आयुष्य सुखी समृद्धीचे व्हावे ही ईशवर चरणी अपेक्षा.
    
आज दि.१२ फेब्रुवारी रोजी शतचंडी यज्ञ , तुलाभार,व सत्कार सोहळा कार्यक्रम स्वयंवर मंगल कार्यालय नांदेड येथे त्यांच्या प्रेमातून उतराई होण्या साठी मुलांनी ठेवला आहे.

हा योग म्हणजे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे जिवा

या प्रमाणे होय. आध्यात्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात यापुढेही काम करण्याची त्यांची ईच्छा अद्वतियआहे. शिक्षण क्षेत्रातला त्यांचा अनुभव समृद्ध आहे, त्यांची काम करण्याची हातोटी आणि कौशल्य हे वंदनिय व अद्वितीयआहे. त्यामुळे त्यांचा समाजाला फायदा होईल कुलकर्णी  (भावजी) सर नियत वयोमानानुसार पासष्टी पार करत  आहेत  त्यांना निरामय दीर्घायुरारोग्य लाभो ही शुभकामना!

बाळासाहेब पांडे मांजरमकर मो : ९४२३३०५८७८
जिल्हाध्यक्ष ग्रामीण आ.भा.ब्राह्मण महासंघ नांदेड
जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व
मराठी पत्रकार संघ (माजी )

Post a Comment

0 Comments