रातोळी येथे विश्ववंदनिय रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त दि.२५ व २६ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून यावेळी दिनांक २५ ते २६ फेब्रुवारी २०२३ रोजी या होणार आहे
रातोळी येथे विविध कार्यक्रमाची रूपरेषा दिनांक २५ फेब्रुवारी सकाळी १० वाजता रांगोळी स्पर्धा तसेच २६ फेब्रुवारी सकाळी ९ वाजता हिंदवी स्वराज्यचे संस्थापक,रयतेचे राजे छॢत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे
रयतेचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक गावातील मुख्य रस्त्यानी निघणार असल्याची माहिती ग्रामसेवक संघटनेचे नायागांव तालुका अध्यक्ष टी जी रातोळीकर यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना दिली असून या भव्य मिरवणूकीत रातोळी येथील महिलांचा मोठया प्रमाणात सहभाग राहणार आसल्यांचे त्यांनी सांगितले आहे
नायगाव तालुक्यातील रातोळी येथे सकाळी १० वाजता रातोळी या गावातील मोकळ्या आसलेल्या जागेच्या ठिकानी वृक्षरोपणाचा कार्यक्रम ही आयोजित करण्यात येणार असून सायंकाळी ५ वाजता माँ जिजाऊ साहेबाचे सुपुत्र शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवन चरित्रावर भाषणासह विविध स्पर्धचे आयोजित करण्यात आले आहेरातोळी येथे सायंकाळी ६ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहेत व फळांचे वाटप कार्यक्रम तसेच संध्याकाळी ठिक ७ वाजता शिवमती रंजनाताई हासुरे उस्मानाबादकर,यांचे जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम समस्त गावकऱ्यानी आयोजित केला आहे या कार्यक्रमास रातोळीव रातोळी परिसरातील सर्व शिवभक्त शिवप्रेमी भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवजयंती मंडळ रातोळी समिती चे अध्यक्ष दिलीप पाटील रातोळीकर,उपाध्यक्ष विष्णु पाटील रातोळीकर,सचिव देवा पाटील,सदस्य विनायक पाटील,ओम पाटील, ऋषी पाटील,मनोज लोसरे , व विश्वांभर पाटील,शिवराज पाटील, तंटामुक्त अध्यक्ष गोविंदराव पाटील आदीसह उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे
नायगाव तालुका ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष टि.जि.पाटील रातोळीकर, सरपंच प्रतिनिधि पिराजी पाटील देशमुख,रातोळी ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक बि.जि.पाटील रातोळीकर, शिवाजी पाटील लुंगारे , संदीप पाटील , सुर्याजी पाटील , साईनाथ बाबुळगावे व समस्त गावकऱ्यांनी या शिव जयंतीनिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे

0 Comments