Header Ads Widget

अख्या जगाला स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांची सिडको येथे जयंती उत्साहात साजरी !!

नांदेड प्रतिनिधी :  दिंगबर शिंदे - 
नांदेडच्या सिडको येथे संत गाडगेबाबा जयंती साजरी आपल्या दमदार व्याख्यानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा मार्ग समाजाला दाखविणारे तसेच सामाजिक प्रबोधनाचा जागर करत परखड विचार व्यक्त करणारे संत गाडगेबाबा यांची दिनांक २३ फेब्रुवारी २०२३ रोजी क्षात्रवीर संभाजी महाराज चौक परिसरातील संत गाडगेबाबा स्मारक सभागृहात जयंती साजरी करण्यात आली आहे 

संत गाडगे बाबा महाराज यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने यावेळी  मान्यवरांच्या हस्ते सकाळी १० वाजता माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले असून संत गाडगेबाबांनी अख्या जगाला स्वच्छतेचा संदेश दिला अशा महान संतांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आली आहे 

यावेळी सामाजिक कार्यकर्ते  किशनराव राकुरे,  प्रभाकर धोंगडे , चेतन शिरसाट, पत्रकार दिगंबर शिंदे,  माजी सरपंच  धनंजय जाधव आदींची यावेळी उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले

यावेळी प्रभाकर धोंगडे यांनी संत गाडगेबाबा यांच्या कार्यावर मनोगतातून प्रकाश टाकला.मोठ्या प्रमाणात सिडको भागातील नागरीकांनी संत गाडगेबाबा स्मारकात येवुन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments