भगवंताला आपल्याशी करून घ्यायचे असेल तर भाविक भक्तांनी प्रेमाने त्यांचे नाम चिंतन केले पाहिजे असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प पांडुरंग महाराज येळेगावकर यांनी हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपूर येथे समस्त गावकऱ्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या साप्ताह या भव्य दिव्य काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून भाविक भक्तांना संदेश दिला आहेतालुक्यातील पळसपुर येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन गावकऱ्यानी केले होते सात दिवसा पासून चालू असलेल्या साप्ताहची सांगता काल्याच्या किर्तनाने करण्यात आली यावेळी आपल्या पुढील कीर्तनाच्या माध्यमातून भाविक भक्ताना संदेश देताना ह भ प पांडुरंग महाराज येळेगावकर म्हणाले की कोणते ही कार्य साद्ये करायचे असेल व पूर्ण करायचे असेल तर स्वतःला वाहून घ्यावे लागते असे ते सप्ताहाच्या कार्यक्रमात ते बोलत होते
यावेळी विचार मंचावर भाविकांना आपल्या कीर्तनातून पांडुरंग महाराज यांनी संदेश दिला की वाईट क्रमाने माणूस रसातळाला जातो मानव धर्मात माणूस जन्मास आल्याच्या नंतर परमेश्वराला आपलेसे केले पाहिजे हरी किर्तन हे केले पाहिजे त्याचा लाभ घेतला पाहिजे असे हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज येहळेगावकर यांनी उदगार व उपदेश दिला असून या काल्याच्या कीर्तन सोहळ्यासाठी शकडो महिला व पुरुष मंडळी व भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते

0 Comments