Header Ads Widget

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी निवडणूक आयोगाला पत्र दिल्याचे चुकून बोललो अशी कबुली एकनाथ शिंदे यांनी दिली

       माधव पवार
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी निवडणूक आयोगाला पत्र दिल्याचे चुकून बोललो अशी कबुली एकनाथ शिंदे यांनी दिली परत एकदा माध्यमाशी बोलताना सांगितले आहे 

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडे पत्र दिलो असे न म्हणता थेट निवडणूक आयोगालाच पत्र दिलं असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते

या संदर्भात राज्यातील कोणत्या ही पोर्टल वाल्यांनी सदरची ऑनलाईन बातमी प्रकाशित केली नव्हती परंतु सर्व प्रथम नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून ऑनलाइन बातमी दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रकाशित करण्यात आली होती

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या निवडणूक आयोगाचे जास्तीत जास्त वारे वाहत असल्यामुळे चर्चेचा विषय बनला असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावनेच्या भरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणण्या ऐवजी निवडणूक आयोगाकडे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी थेट पत्र दिले असल्याचे सांगितले होते

सर्व राज्यभर मुख्यमंत्र्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या वायरल झालेल्या व्हिडिओचा आधार घेत नांदेड जिल्ह्यातुन नायगाव फास्ट न्यूजनच्या माध्यमातून सदरची दमदार ऑनलाईन बातमी प्रकाशित करण्यात आली होती

Post a Comment

0 Comments