Header Ads Widget

गागलेगाव जवळ भरधाव कारने मोटर सायकलला उडविले काका पुतण्या कोळगावचे कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

      माधव पवार 
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लोहगाव ते उमरी मार्गावर असलेल्या गागलेगाव फाट्या जवळ लोहगाव कडून उमरी कडे जाणाऱ्या भरगाव कारने आणि याच मार्गावर कोळगाव येथून देगाव येथील माजी सरपंच स्व.दिगंबरराव किशनराव पाटील मोरे यांच्या अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या मोटर सायकला कारने जोराची धडक दिली काका आणि पुतण्या जखमी झाले आहेत

बिलोली तालुक्यातील कोळगाव येथील रहिवासी असलेले आनंदा कोंडीबा हिवराळे आणि आबाराव जक्कोजी हिवराळे हे काका पुतण्या सदरच्या अपघातात जखमी झाले असल्यामुळे त्यांना नांदेड येथे उपचारासाठी  पाठवण्यात आल्याची माहिती मिळते आहे

तालुक्यात असले तरी कोळगाव व गागलेगाव ही दोन्ही गावे कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतात या फाट्याजवळ कारने मोटर सायकलस्वरास जबर धडक दिली असल्याची माहिती ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जेमादार निकम यांनी दिली आहे

गागलेगाव फाट्यावर घडलेल्या घटनेत कार मधील एका महिलेसह एक व्यक्ती म्हणजे अभियंता असल्याचे सांगण्यात येते ते राहेर येते दत्त मंदिराचे बांधकाम चालू असल्यामुळे त्या ठिकाणची पाहणी करण्यासाठी जात होते असल्याचे सांगण्यात येत असून सदरची घटना ही दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ रोजीची अंदाजे २ ते ३ वाजण्याच्या दरम्यानची आहे

अपघातील सदरची कार क्रमांक एम २६ बी क्यू ८१०१ ही रस्त्याच्या डाव्या बाजूच्या खड्ड्यात पडली तर मोटर सायकल  क्रमांक २६ सी सी ४९९७ ही उजव्या बाजूच्या खड्ड्यात पडली असल्यामुळे मोटरसायकल वरील कोळगाव येथील रहिवासी असलेले काका आणि पुतण्या जखमी झाले जखमीना नांदेड येथे उपचारासाठी पाठवण्यात आल्याची माहिती आहे

Post a Comment

0 Comments