Header Ads Widget

नामदार नितीन गडकरी यांचे कडे भायेगाव गोदावरीचा पूल तात्काळ मंजूर करण्यात यावा म्हणून खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह शिवराज पाटील होटाळकर यांनी केली मागणी -

      माधव पवार
नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर या भाजप राजकीय नेते मंडळीच्या वतीने केंद्रीय मंत्री तथा रस्ते वाहतूक महामार्ग भारत सरकार नामदार नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली आहे 

नायगाव व उमरी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या भायेगाव गोदावरीचा पूल अतिशय महत्वाचा असल्यामुळे ते तात्काळ मंजूर करण्यात यावा या मागणीसाठी निवेदन देऊन चर्चा केलेली आहे

भारताचे केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक महामार्ग भारत सरकार नामदार नितीन गडकरी यांनी दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ रोजी नांदेड येथे आले असता नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह शिवराज पाटील होटाळकर यांनी नांदेड जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात नितीन गडकरी यांना विविध मागण्याचे निवेदन दिले आहे

नायगाव तालुक्यातील होटाळा येथील रहिवासी असलेले तथा राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय व दमदार कामगिरी करणारे आणि राजकीय  वर्तुळात राजकीय वादळ निर्माण करणारे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी भाजपा पक्षाचे काम करीत आहेत

भाजपा पक्षांचे नेते नामदार नितीन गडकरी यांनी नांदेड येथे आले असता भायेगाव गोदावरी पुलाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची मागणी नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह शिवराज पाटील होटाळकर यांनी  सदरचा पूल तात्काळ मंजूर करण्यात यावा अशी मागणी एका निवेदनाद्वारे आपल्या नेत्याकडे केली आहे 

Post a Comment

0 Comments