Header Ads Widget

महाराष्ट्राचे राजकारण गोंधळी विकासाचे नाव नाही राजकीय नेते मंडळी कोर्ट कचेरीत हैराण -? -

     माधव पवार
भारतीय लोकशाहीत देशातील इतर राज्यापेक्षा महाराष्ट्र राज्यात गेल्या वर्षा पासून राजकीय गोंधळ चालूच असल्यामुळे नुसता निधीचा बडी मार होता ना दिसतो परंतु विकास मात्र कागदावरच असतो विकासराव म्हणजे विकास कुठेच दिसत नसल्याचे स्पष्ट चित्र राज्यातील व ग्रामीण भागातील रस्त्यावरून दिसून येत आहे
राज्यातील घडामोडी दैनंदिन पाहिल्या तर टीव्ही चॅनलचे बटन चालू करतात राज्यातील नेते मंडळीचा गोंधळ व कोर्टाच्या दरबारात सुनावण्याचा बडीमार चालूच असल्याचे तमाम राज्यातील जनतेसह जगाला पहा लागत आहे

हे कुठे तरी राजकीय मंडळींनी आपल्या विचारधारेतून व दूरदृष्टीतून राज्याचा विकास करण्यासाठी पुढे येण्याची गरज असताना सुद्धा राजकीय नेते मंडळीचा काय करता गोंधळ राज्यात थांबताना दिसत नसल्याचे वास्तव चित्र महाराष्ट्र राज्यात दिसून येत आहे
गेल्या दहा वर्षाच्या कालखंडातील राजकारण आणि सध्याच्या परिस्थितीत चालत असलेल्या राजकारणा मध्ये मोठी जनतेला तफावत जाणवत असून राज्याच्या राज्यकर्त्यांनी राज्यातील जनतेचा विचार करून राज्याचा विकास करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे

राज्यात नुसता विकासराव म्हणजे विकास करण्यासाठी काही वेळ लागू शकत नाही असे केले तर राज्याचा विकास होण्यासाठी फारसा वेळ लागत नाही परंतु राज्यातील राजकीय पुढारी केवळ कोर्ट कचेरीतच हैराण असल्याचे ही वास्तव चित्र दैनंदिन जनतेला पहावे लागत आहे

Post a Comment

0 Comments