Header Ads Widget

सार्वजनिक बांधकाम विभागासह गुतेदाराला बरबडा ते वजीरगाव ओड्यातील अर्धवट पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी अजून किती वर्षे लागणार ? -

      माधव पवार
नायगाव तालुक्यातील बरबडा ते वजीरगाव मध्ये असलेल्या मोठ्या ओढ्यातील पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी अजून गोदावरी पाठबंधारे विभागासह गुत्तेदाराला किती वर्षे लागतील असा प्रश्न या विभागातील जनतेला पडला असल्यामुळे सदरच्या जनतेतून चर्चेला होताना ऐकावयास मिळत असून भर पावसाळ्यात या ओढ्याला बळेगाव बंधाऱ्याच्या बँक वॉटरच्या पाण्यामुळे बरबडा व वजीरगाव नागरिकांना मोठा त्रास जाणवत आहे
तालुक्यातील बरबडा ते वजीरगाव पुलाचे उद्घाटन तत्कालीन नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बरबडा नगरीचे विद्यमान सरपंच बालाजी मदेवाड होते सदरच्या पुलाचे उद्घाटन करून जवळ पास तीन वर्षे पूर्ण होत आहेत

पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी गुत्तेदारानी बरबडा गाव वासियांना सहा महिन्याचा कालावधी दिला होता परंतु तीन वर्षे पूर्ण होत आहेत तरी ही अद्याप काम पूर्ण झाले नसल्यामुळे अजून किती वर्षे लागतील अशी चर्चा होताना या विभागातील जनतेतून ऐकावयास मिळत आहे
येथील गोदावरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार पणामुळे व गुत्तेदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे गेल्या अडीच ते तीन वर्षा पासून सदरचे काम रेंगाळले असल्यामुळे या वर्षी तरी पूर्ण होणार की नाही अशी शंका व भीती या विभागातील जनतेला पडली आहे

बरबडा ते वजीरगाव ओढ्यातील सध्याच्या परिस्थितीत पाणी कमी झाले असल्यामुळे व काम करण्यासाठी काही अडचण होत नसल्याने गोदावरी पाट बांधधारे विभागासह सदरच्या गुतेदारांनी काम तात्काळ चालू करावी अशी मागणी या विभागातील जनतेने केलेली आहे 

Post a Comment

0 Comments