Header Ads Widget

नायगावच्या गटविकास अधिकाऱ्यांना घरकुले मंजूर करून देण्यासाठी फिरावे लागते लाभार्थ्यांच्या घरोघरी सरपंच आणि ग्रामसेवक करतात तरी काय ? -

      माधव पवार
नायगाव पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी एल आर वादे यांना तालुक्यातील लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन रमाई आवास योजनेचे प्रस्ताव मंजूर करावी लागत असल्यामुळे सदरच्या गावातील सरपंच व ग्रामसेवक नेमके करता तरी काय असा प्रश्न जनतेला भेडसावत आहे
लाभार्थ्यांना मंजूर घरकुले असताना सुद्धा ग्रामपंचायत कार्यालयाच्या मार्फत पंचायत समितीकडे प्रस्ताव जास्तीचे गेला नसल्यामुळे स्वतः पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांनी लाभार्थ्याच्या घरी जाऊन प्रस्ताव मागून घ्यावा लागत असल्याचे चित्र कृष्णूर येथे दिनांक १ फेब्रुवारी २०२३ वास्तव चित्र दिसून आले आहेनायगाव पंचायत समिती कार्यालयात गेल्या वर्षापासून कार्यरत असलेले व कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी एल आर वादे यांनी रमाई आवास योजनेच्या बाबतीत गोरगरीब लोकांना शासनाच्या मार्फत आलेले घरकुले तात्काळ देण्यासाठी प्रयत्न करीत असल्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या सर्व पंचायतीच्या गटविकास अधिकाऱ्या पैकी एल आर वादे हे एकमेव दिसून येत आहेतालुक्यातील खेड्यापाडयात मंजूर लाभार्थ्यांना घरे मिळवून देण्यासाठी सरपंच व ग्रामसेवकांचे कर्तव्य असते घरकुलाचा प्रस्ताव पंचायत समितीला पाठवण्याचे तसे होत नसल्याचे स्पष्ट दिसून येते की स्वतःला गटविकास अधिकाऱ्याना मंजूर घरकुल धारकाच्या घरी जाऊन कागद पत्रे मागून घ्यावे लागत असल्याचा प्रसंग कृष्णूर येथे दिसून आला आहे

खेड्यापाड्यात मंजूर लाभार्थ्यांचे प्रस्ताव मागून घेत आहेत पूर्वी पंचायत समितीकडे काही प्रस्ताव आलेले आहेत परंतु त्यातील तुरट्या काही भरून काढायच्या असल्यामुळे स्वतः गट विकास अधिकारी लाभार्थ्यांच्या घरी जाऊन कागदपत्र गोळा करत असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहेत 

Post a Comment

0 Comments