नायगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी तेलंगना राज्यातुन गुजरात राज्यात भुसा घेऊन जाणाऱ्या एका डी एन ०९ ९१५३ या कंटेनरचा तोतया पोलिसांनी सिनेस्टाईल इंडिका कारच्या सहाय्याने पाटलाग करून रातोळीच्या मन्याड नदी जवळ कंटेनरच्या समोर आडवी लावले आहे
चालकास बाहेर काढत मारहाण केली व चालका जवळील ५० हजार रुपये व एक मोबाईल तोतया पोलिसांनी लुटण्याची घटना समोर आली आहे
नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रातोळी मन्याड नदीवर घडली असल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत वाहन धारकात ही भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे वाहन चालकातून बोलल्या जात असले तरी सदरच्या कंटेनर चालकाचे हातपाय बांधून तोतया पोलिसांनी मुखेड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेले शिखरा शिवारात फेकून दिल्याचे सांगण्यात येते या घटनेतील एका तोतया पोलिसांना सोनखेड पोलिसांनी ही सिनेस्टाईल कंटेनरचा पाठलाग करणाऱ्या आरोपीस शोले स्टाईल पकडले आहेतेलंगणा राज्यातून कंटेरच्या साह्याने भुसा घेऊन गुजरात कडे जाणाऱ्या कंटेनरला चार ते पाच तोतया पोलिसांनी पोलीस असल्याचे चालकाला भासवून त्यांच्या जवळील असलेली इंडिका कार कंटेनरच्या समोर लावली सदर कंटेनरचा पाठलाग करणाऱ्या कंटेनरच पळवून नेणाऱ्या तोतया पोलिसांना सोनखेड पोलिसांनी पकडून नायगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे
सदरचा कंटेनर चालक संतोष वीरभद्र बोडके राहणार पोखरणी तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील रहिवासी असलेला चालक हा कंटेनरच्या साह्याने तेलंगणा राज्यातून भुसा घेऊन गुजरात कडे जात असताना चालकांचे हातपाय बांधून इंडिका कार मध्ये टाकून नेल्याचे सांगण्यात येते चालकास मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शिकारा शिवारात फेकून दिल्याचे कळते आहेसदरचा कंटेनर चालकांच्या ताब्यात असलेला कंटेनर तोतया पोलिसांच्या टोळक्याने पळवित असताना सदरची बाब लोहा तालुक्यातील सोनखेड पोलीस स्टेशनला कळविण्यात आली येथील रात्रीच्या गस्तीवर असलेल्या चतुर पोलिसांनी सदरच्या कंटेनरवर चांगलीच पाळत ठेवली होती कंटेनर येताच लाल दिव्याची पोलीस गाडी आडवी लावताच तोतया पोलिसांनी पळ काढत असताना एकास पकडले मात्र बाकी पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे
यातील एका आरोपी गंगाधर बळीराम सालकमवाड राहणार डोलारा तालुका लोहा यांना सोनखेड पोलिसांनी पकडून नायगाव पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याचे सांगण्यात येत असून आधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे
नांदेडच्या नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच सोनखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी विशाल भोसले यांच्यासह ठाणे अंमलदार रमेश वाघमारे पोलीस जिप चालक अतुल नागरगोजे यांच्या विशाल कामगिरीमुळे पळवा पळवितील कंटेनर लातूरच्या दिशेने पळ काढत असताना यातील तोतया पोलिसाच्या टोळीतील चार ते पाच जन पसार झाल्याचे सांगण्यात येते आहे

0 Comments