Header Ads Widget

नांदेडच्या सिडको भागात असलेल्या जुन्या वसंतराव नाईक महाविद्यालयात जवळ गोळीबार एकाची हत्या करण्यात आली असल्यामुळे शहरात खळबळ

      माधव पवार
नांदेडच्या सिडको भागात असलेल्या जुन्या वसंतराव नाईक महाविद्यालयात जवळ गोळीबार एकाची हत्या करण्यात आली असल्यामुळे शहरात एकदम खळबळ उडाली असल्याचे सांगण्यात येत असून या प्रकारणी पोलीस घटना स्थळी रवाना झाले असल्याची माहिती मिळते आहे शहारातील सिडको भागात असलेल्या जुन्या वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या समोर गोळीबार करण्यात आला यात एकाची हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना समोर आली असून शहरांत गोळीबाराच्या घटना घडत असल्याने एक प्रकारचे पोलिसांना गोळीबार करणारे एक प्रकारचे आवाहनच देत आहेत
जुन्या वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या समोर एका  युवकांच्या हत्या केल्याची घटना दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ रोजी संध्याकाळी अंदाजे ९ वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेमुळे शहरात व परिसरात येथील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगण्यात येत आहे नांदेड शहर परत एकदा गोळीबाराने हदरले असून 
सिडको येथील राज प्रदीप सरपे राहणार सिडको या युवकानी रात्री ९ वाजताच्या दरम्यान सिडको येथील जुन्ने वसंतराव नाईक महाविद्यालया समोरून जात होता तितक्यात अज्ञात मारेकरी पिस्तुलच्या सहयाने त्यांच्यावर अचानक गोळीबार केल्याची घटना घडली आहे

त्या युवकांची अज्ञात मारेक-यांनी नेमके कोणत्या करणा वरून हत्या केली हे मात्र स्पष्ट समजले नसून सदरचे अज्ञात आरोपी गोळीबार करून घटनेच्या ठिकाणा वरुन फरार झाले असल्याचे सांगण्यात येते आदिकची माहिती मिळू शकली नाही हे स्पष्ट आहे 

या घटनेत गंभीर जखमी झाला असल्यामुळे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते परंतु येथील कार्यरत असलेले डॉक्टरांनी मृत घोषित केले

Post a Comment

0 Comments