Header Ads Widget

आमदार राजेश पवार यांच्या पुढे विकासाच्या संदर्भात अनेकांचा रुई येथे प्रश्नाचा बडीमार ? -

           माधव पवार
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांच्यावर विकासाच्या संदर्भात रुई बु. येथे गावातील सुज्ञान नागरिकांनी प्रश्नाचा बडीमार करत घुंगराळा ते बळेगाव रुई रस्त्यांचे काय झाले असे विचारण्यात आले असल्याची चर्चा रंगत आहे 

रुई बु येथे असे अनेक प्रश्न आमदार राजेश पवार यांना विचारले असता मार्च महिन्यात काम चालू करण्यात येईल म्हणून निघून गेले असल्याचे ही सांगण्यात येत आहे 

काही तरुणांनी आमदार राजेश पवार यांना असा प्रश्न केला की साहेब तुम्ही मोटार सायकलवर बसा रस्त्याची काय अवस्था झाली डोळ्यानी बघा तेव्हा कळते गाडीत येता आणि जाता दुःख आम्हाला होतोय रस्त्या वरचा धुरळा उडतोय रस्ता कधी करता म्हणून असे प्रश्नाचा बडीमार करण्यात वास्तव चित्र आहे 

रुई बु येथील पुलाची उंची नसल्यामुळे ते उंच करण्यात यावी भर पावसाळ्यात ओढ्याचे पाणी आमच्या घरात जाते यांची तात्काळ काही तरी व्यवस्था करावी पूल उंच करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावेत असे सुज्ञान नागरिकानी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न उपस्थित केले आहे

नायगाव विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या पुढे विकासाच्या संदर्भात अनेका युवकांचा रुई येथे प्रश्नाचा बडीमार करण्यात आल्याची चर्चा मोठया प्रमाणात होताना ऐकावयास मिळत आहे 



Post a Comment

0 Comments