Header Ads Widget

आमदार राजेश पवार यांच्यासह राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या हस्ते रुई येथे एक कोठी ३४ लाख २३ हजाराचे पाणी पुरवठ्याचे उदघाटन !!

      माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे रुई बु येथे जल जीवन मिशीन अंतर्गत आमदार राजेश पवार यांच्यासह राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या हस्ते दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ रोजी साडे दहा ११ वाजण्याच्या दरम्यान उदघाटन करण्यात आले असून सदरच्या योजने अंतर्गत करण्यात आले आहे
रुई बु येथे करण्यात आलेले पाणी पुरवठ्याचे काम १ कोठी ३४ लाख २३ हजार रुपये मंजूर करण्यात आले परंतु सदरचे काम गुत्तेदारानी तात्काळ चालू करावे अशी अपेक्षा गावकऱ्यानी केले आहे तालुक्यातील रुई बु येथे जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा नायगाव येथील इंजिनियर विठ्ठलवार यांच्याशी संपर्क करून माहिती घेतली असता सदरच्या पाणी पुरवठा नळ योजनाच्या अंतर्गत टाकीचे व विहिरीचे काम पूर्ण करण्यासाठी जवळ पास आठरा महिने लागलील असे गुत्तेदारासह पाणी पूरवठ्याच्या कर्मचाऱ्यानी सांगितले आहे 
नायगाव ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या कर्मचारी उदघाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते सदरचा कार्यक्रम हा गावच्या महिला सरपंच सौ प्रिंकाताई निलेश देशमुख यांचे प्रतिनिधी निलेश देशमुख यांच्यासह ग्रामसेवक नागोराव सूर्यवंशी यांनी सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहेरुई बु येथे मंजूर करण्यात आलेली सदरची योजना जल जीवन मिशन अभियान ही भारत सरकारची पथदर्शी योजना असून देशातील सर्व ग्रामीण घरांमध्ये सन २०२४ पर्यंत नळाने हर घर नळ योजना आहे

पुरेशा प्रमाणात योग्य दर्जाचा नियमित आणि दीर्घकाळ पाणी पुरवठा करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने केंद्र सरकार ह्या योजनेची अंमलबजावणी केली आहे

नागरिकांना पाणी मोठया प्रमाणात मिळवून देण्यासाठी तात्काळ गुत्तेदारानी चालू करावे अशी मागणी जोर धरित आहे

Post a Comment

0 Comments