Header Ads Widget

शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सर्वांनी आत्मसात करावे युवा नेते प्रा.रवींद्र पा.चव्हाण यांचे प्रतिपादन !!


विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे
:- 


जिजाऊ मातेने छत्रपती  शिवरायांना जनतेची कसल्या प्रकारची काळजी घ्यावी व महिलांचा आदर कसा करावा चांगल्या पद्धतीचे शिक्षण देत अठरा पगड जातीच्या मावळ्यांना घेऊन राज्य करणारा शिवराय निर्माण केले आहे

माँ जिजाऊ मातेने शिवराय कथा व संस्कार देऊन घडविला त्यांच्या घडविलेल्या शिव चरित्राचे प्रत्येकाने आत्मसात केल्यास खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी केल्याचा आनंद स मिळेल असे  मत युवा नेते प्रा.रवींद्र वसंत पाटील चव्हाण यांनी केले.     

नायगाव येथील शिवम नगर कॅनाल रोड येथील शिव प्रेमी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या शिवम जयंती महोत्सवाच्या निमित्ताने ते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावावरून बोलत होते. युवा नेते प्राचार्य रवींद्र चव्हाण यांनी लहान बालकांचे विचार एकूण त्यांचे तोंड भरून कौतुक केले.आहे 

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून न.प. गटनेते सुधाकर शिंदे,नगराध्यक्ष प्रतिनिधी गजानन सुरेश कल्याण, उपनगराध्यक्ष प्रतिनिधी विराज विजय पा चव्हाण, मा.नगरसेवक पांडुरंग पाटील चव्हाण, माणिक पाटील चव्हाण, संजय पाटील चव्हाण,मा.नगराध्यक्ष प्रतिनिधी नारायण जाधव, बालाजी शिंदे, शिवव्याख्याते प्रा.मानसिंग ताटे, माजी गटशिक्षणाधिकारी अशोक पवळे,ग्रामीण कवी बालाजी पेटेकर, आनेराये सर , जेष्ठ

पत्रकार बाळासाहेब पांडे,गजानन चौधरी यांच्यासह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.शिवजन्मोत्सवाची सुरुवात शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.प्रा.ताटे यांनी शिवचरित्रावर विशेष प्रकाश टाकला तर कवि बालाजी पेटेकर सर व व्यंकट अनेराये सर यांच्या कवितेनी कार्यक्रमात रंगत आणली.
  
यावेळी प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.तसेच या कार्यक्रमात शिवमनगर मित्र  मंडळातील 22 विद्यार्थ्यांनी शिव चरित्रावर सखोल भाषण केले.शिवचरित्रावर मनोगत मांडणाऱ्या,व निबंध व चित्रकला स्पर्धा मध्ये यशस्वी बालकांचा  बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

शिवजन्मोत्सव विविध उपक्रमाने थाटात उत्साहाच्या वातावरणात साजरा केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.शिंदे हिने केल.तर आभार जाधव सर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महिला पुरुष विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमा नंतर उपस्थितांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.

Post a Comment

0 Comments