Header Ads Widget

नांदेड येथे कुसुम महोत्सोवाची धूम वैशाली सामंत व वैभव मांगले यांच्या हस्ते उद्घाटन

      एस एम मुदखेडकर
देशाचे माजी गृहमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या सहचारिणी कै.सौ. कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दि. १  ते ३ मार्च दरम्यान नांदेड येथे आयोजित केलेल्या कुसुम महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध गायिका वैशाली सावंत व अभिनेतेन वैभव मांगले यांच्या हस्ते होणार आहे.

या महोत्सवात विविध कार्यक्रमांची धूम राहणार असुन १३५ स्टॉल मधील तब्बल ४५ स्टॉल हे खवय्यांना खाण्याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी विविध खाद्य पदार्थांचे ४५ स्टॉल लावण्यात आले आहेत. 

हा तीन दिवसीय महोत्सव येथील यशवंत महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात होणार असून, महोत्सवाच्या काळात दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत महिलांनी व तयार केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. त्यासाठी सुमारे १३५ स्टॉल्स उभारले आहेत. 

कुसुम महोत्सवाचे उद्घाटन १ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सुप्रसिध्द गायिका वैशाली सामंत व अभिनेता वैभव मांगले यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री अनुश्री फडणीस करणार आहेत. याच दिवशी सायंकाळी ६.३० वा. वैशाली सामंत यांच्या सुमधूर बहारदार गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

गुरुवार दि. २ मार्च रोजी सायंकाळी ६  वा. मराठी वेषभूषेची गौरवशाली परंपरा सांगणारा मराठमोळी हा फॅशन शो होणार आहे. यामध्ये अनेक स्थानिक महिला व युवती सहभागी होतील. परीक्षक म्हणून मधुरा वेलणकर, योगेश सोहनी, अनुश्री फडणीस जबाबदारी सांभाळणार आहेत. 

दि. ३ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वा. विविध क्षेत्रात कार्यकर्तृत्वाची मोहर उमटविणाऱ्या महिलांचा नवदुर्गा सन्मानाने गौरव करण्यात येईल. याच दिवशी नृत्य संगीताचा कलाविष्कार आदिशक्ती हा कार्यक्रम होणार आहे.

महिला शक्तीचा जागर व सक्षमीकरणासाठी आयोजित कुसुम महोत्सवामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजिका सौ.अमिताताई चव्हाण, कु. सुजया अशोकराव चव्हाण व कु. श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments