Header Ads Widget

रातोळी शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न २६ फेब्रुवारी रोजी शिवमती रंजनाताई हासुरे उस्मानाबादकर यांचे जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न !!

      माधव पवार
नायगाव तालुक्यातील रातोळी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी
महाराज यांच्या जयंती निमित्त दि.२५ व दि.२६ फेब्रुवारी 2023 रोजी विविध सामाजिक कार्यक्रम सादर करण्यात आले यावेळी दि.२५  फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी १० वाजता  रांगोळी स्पर्धा,तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे 
 दि.२६ फेब्रुवारी सकाळी ९ वाजता हिंदवी स्वराज्य चे संस्थापक,रयतेचे राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या  भव्य मिरवणूकीत रातोळी येथील महिलांचा सहभाग मोठया प्रमाणात उपस्थित होता.

तसेच सकाळी १० वाजता  रातोळी या गावातील मोकळ्या आसलेल्या  जागेच्या ठिकानी वृक्षरोपणाचा  कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच सायंकाळी सहा वाजता फळांचे  वाटप,व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी सायंकाळी सात वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवन चरित्रावर  भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आले,या कार्यक्रमा च्या सुरवातीला शिवमती रंजनाताई हासुरे उस्मानाबादकर यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्या चे संस्थापक रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुजन करून,दिप प्रज्वलित करून या कार्यक्रमाची  सुवात करण्यात आली.यावेळी या  भाषण स्पर्धे मध्ये जि.प प्राथमिक  शाळा रातोळी येथील बालविद्यार्थीनी नायगाव तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष श्री टि.जि.पाटील रातोळीकर यांची पुतनी व बाबु पाटील रातोळीकर यांची नात कु.स्वरा पाटील रातोळीकर यांनी श्री छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जिवन चरित्रावर भाषण केले या जोरदार भाषणाने उपस्थितांची मने प्रसन्न झाले, 
 यावेळी त्यानंतर व्याख्याते शिवमती रंजनाताई उस्मानाबादकर, यांचे  व्याख्यान  करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. हाणमंत पाटील रातोळीकर यांनी केले. यावेळी शिव जयंती मंडळ रातोळी समिती चे अध्यक्ष दिलीप पाटील रातोळीकर,उपाध्यक्ष विष्णु पाटील रातोळीकर,सचिव देवा पाटील,सदस्य  विनायक पाटील,ओम पाटील, ऋषी पाटील,मनोज लोसरे , व विश्वांभर पाटील,शिवराज पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष गोविंदराव पाटील, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष टि.जि.पाटील रातोळीकर, सरपंच प्रतिनिधि पिराजी पाटील देशमुख, रातोळी ग्रामपंचायत कार्यालयाचे

ग्रामसेवक बि.जि.पाटील रातोळीकर,  संदीप पाटील , सुर्याजी पाटील ,अंकुश पाटील, छावा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. विनायक पाटील माहेगावकर , प्रकाश पाटील ,राहुल पाटील, पत्रकार गजानन पाटील, साईनाथ बाबुळगावे , संतोष कंधारे, संतोष पांचाळ शिवाजी पाटील लुंगारे व समस्त गावकऱ्यांन सह परिसरातील शिवभक्त,शिवप्रेमींची उपस्थितिथी मोठ्या प्रमाणात होती.

Post a Comment

0 Comments