Header Ads Widget

" मरणाच्या दारी माय मराठी धडपडं " इंग्रजीच्या खांद्यावर जाईल मराठीच मड ""

      मधुकर जवळे 
महाराष्ट्राची मातृभाषा, राजभाषा ही मराठी असून तीला महाराष्ट्रातील मराठी माणसंच मराठी माईला सावत्र आई सारखे वागुन मराठी भाषेला मरणाच्या दारात उभी केले.इंग्रजीही निश्चितच जागतिक वैचारिक भाषा आहे.आम्हास सर्व भाषांचा आदर आहे पण मराठी माणसाकडुनच इंग्रजी भाषेचे वाढलेले स्तोम यामुळे मराठी भाषा ही मरणावस्थे पर्यंत पोहोचली आहे

असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक आणि चित्रकार बालाजी पेटेकर, खतगावकर यांनी नुकत्याच शरदचंद्र महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते

यावेळी बालाजी पेटेकर यांनी "सखी या संघ पावसात भिजू दे काळजात लागलेली आग विझू दे "आम्हीही प्रेम केलो होतो" या प्रेम कवितेला महाविद्यालय तरुण-तरुणी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे 

त्यांनी मरनाच्या दारामध्ये माय मराठी धडपड आणि हलकट जीवाची काजळ माया* ह्या चिंतनशील कवितेनी सर्वांना विचार करायला भाग पाडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावियालयाचे प्राचार्य डॉ.के. हरीबाबू हे होते. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलन करून करण्यात आले.

यावेळी जेष्ठ प्रा.डॉ. शंकर गड्डमवार, प्रो.डॉ. बलभीम वाघमारे यांनीही आपले मनोगत मांडले. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.के. हरीबाबू यांनी महाराष्ट्रासह सर्वच राज्यांनी मातृभाषेचा आदर करावा तर इंग्रजी ही बहुआयामी ज्ञान मिळविण्यासाठी तसेच इतराबरोबर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उपयोगात आणावी. सदर कार्यक्रम प्रा.बालाजी गायकवाड, प्रा.डॉ. प्रकाश हिवराळे, प्रा. हणमंत हांडे यांच्या पुढाकारातून घेण्यात आला आहे 

कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये ग्रंथपाल डॉ.बी.आर. लोकलवार यांच्या सहकार्याने ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन व्याख्याते बालाजी पेटेकर यांच्या हस्ते करुन भव्य ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले.त्यानंतर मराठी विभागाने तयार केलेल्या प्रा.हांडे यांच्या पुढाकाराने तयार केलेल्या "युवा दर्पन" भितीपत्रकाचे अनावरण बालाजी पेटेकर, प्राचार्य डॉ.के. हरीबाबू, उपप्राचार्य डॉ. शाम पाटील, यांच्या उपस्थितीत झाले.

यावेळी प्रो.डॉ.पानपट्टे, प्रो.डॉ.बलभीम वाघमारे ,प्रो.डॉ.श्रीरंग वट्टमवार,प्रा.डॉ. शंकर गड्डमवार, प्रा डॉ.सानप, प्रा.डॉ.सिद्दीकी,प्रा.डॉ. शकुंतला शिंदे,प्रा.सुरज अंजनीकर,प्रा.डॉ. भालेराव प्रा.डॉ.महानंदा राऊतखेडकर, प्रा.पांगरकर मॅडम, प्रा.डॉ. गो.रा.परडे, प्रा.डॉ.साईनाथ वाघमारे, डॉ.पी.जी. धुमाळ, प्रा. श्रीनिजा स्वामी, प्रा. संजय गायकवाड,

प्रा.डॉ. राजेश रोकडे, प्रा. श्रीकांत वाघमारे, प्रा.बालाजी वाघमारे, प्रा.सुभाष गायकवाड, प्रा. माधव गुंडले, प्रा. चव्हाण,प्रा.बा ना काळे, संतोष भालेराव, देवीदास भाकरे आणि महाविद्यालयीन विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.बालाजी गायकवाड यांनी केले तर आभार हरीपाल हंबर्डे या विद्यार्थ्यांनी मानले.

Post a Comment

0 Comments