Header Ads Widget

नायगाव विधानसभा मतदार संघात नेत्याचे उद्घाटने जोमात रस्ते मात्र कोमात -श्रीफळ फोडणे म्हणजे विकास नव्हे : पुढाऱ्यानी फिरवली पाठ -


नायगाव प्रतिनिधी : 
मधुकर जवळे :-

नायगाव विधानसभा मतदार संघाची निर्मिती झाली तेव्हा पासून नायगाव विधानसभा मतदार संघातील रस्त्यांची वाट चांगलीच लागली असताना सुद्धा या भागातील राजकीय पुढारी नुसते उद्घाटन करूनच स्वतःच्या पाठीवर स्वतःची थाप मारीत असल्याचे चित्र सध्या तरी नायगाव विधानसभा मतदार संघात दिसून येत आहे

या नायगाव विधानसभा मतदार संघात मातभर पुढारी आहेत काही मंत्री झाले आमदार ही झाले परंतु रस्त्याची समस्या अद्याप सुटली नसल्यामुळे जनसामान्याचे मोठया प्रमाणात बेहाल होताना दिसून येत आहे

सदरचे रस्ते करण्यासाठी कित्येक कोटी रुपयाचा निधी आणले असल्याचे राजकीय पुढारी सांगतात आणि जनतेच्या डोळ्यात धूळ टाकत वास्तव चित्र पाहिले तर घुंगराळा बळेगाव रुई रस्ता हा राजकीय पुढाऱ्यांनी प्रथम त्या रस्त्यावर जाऊन पाहून घ्याव असे या विभागातील जनतेनी प्रश्न उपस्थित केला आहे

शासनाकडून निधी मोठ्या प्रमाणात मंजूर करण्यात आला असला तर रस्त्यांचे कामे का होत नाहीत असा ही प्रश्न चर्चेला जात असला तरी या नायगाव विधानसभा मतदार संघातील राजकीय पुढारी नुसते उद्घाटन करून मोकळे होतात उद्घाटनाचे श्रीफळ फोडणे म्हणजे विकास नव्हे असा ही प्रश्न जनतेतून चर्चेला जात आहे

या विभागाचा विकास करण्यासाठी दूरदृष्टी विकास पुरुषांची गरज असल्याचीही सदरच्या जनतेतून बोलल्या जात असले तरी सदरच्या पुढाऱ्यानी विकासा बरोबर रस्त्याकडे पाठ फिरवली असल्याचे सरळ सरळ वास्तव पाहावयास मिळत आहे 

Post a Comment

0 Comments