महाराष्ट्रातील नांदेड जिल्हा हा भौगलीक साधन संपतीने पश्चिम महाराष्ट्राच्या क्षमतेपेक्षा ही पुढे असल्यामुळे या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी लाभलेली गोदावरी नदी सह मन्याड नदी आणि पेनगंगा असल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी माय बाब अतिशय सुजलाम सुफला झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे कवळे गुरुजी यांनी दिली आहे
शेतकऱ्यांच्या विविध लागवडीच्या माध्यमातून उत्पन्न वाढले पाहिजे या भागातील शेतकरी राजांना न्याय मिळवून देण्याचे काम केले तरच शेतकरी बांधव समाधान होईल असे प्रसिद्ध उद्योजक तथा माजी जिल्हा परिषदेचे सदस्य मारोतराव कोळी गुरुजी यांनी प्रतिक्रिया दिली आहेसध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधी कडून लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही अथवा राजकीय मंडळी लक्ष देण्यास धजावत नाही राजकीय खुर्ची म्हणजे काय शोभेची वस्तू नसून अथवा स्वतःचे पोट भरण्यासाठी सदरची खुर्ची नसल्याचे ही माजी जिल्हा परिषदेचे सदस्य कवळे गुरुजी यांनी बेधडक तोफ नायगाव फास्ट न्यूज शी बोलताना डागली आहे
गेल्या अनेक वर्षापासून या विभागात घराणे शाहीतील लोकप्रतिनिधी होऊन गेले आहेत यांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला न्याय मिळाला नाही जनतेला केवळ विकास पाहिजे मोठेपणाचा ठसा नकोय असे कवळे यांनी सांगितले आहे
राज्यातले राजकीय वर्तुळ पाहिले तर राज्यातले राजकारण मोठ्या प्रमाणात विचित्र झाले असून या भागातील लोकप्रतिनिधींनी विकासाचे ध्येय धोरण डोळ्यासमोर ठेवून विकास केला पाहिजे राजकीय खुर्ची ही काय शुभेच्छा वस्तू नाही ती खुर्ची विकास करण्यासाठी देण्यात आलेली सन्मानाची खुर्ची असल्यामुळे या भागाचा विकासच झाला पाहिजे असेही काँग्रेस पक्षाचे प्रसिद्ध उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांनी सांगितले आहे

0 Comments