Header Ads Widget

कृष्णूरच्या समाधान रेस्टॉरंट येथे सपोनि महादेव पुरी पस्तीसव्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा संपन्न !!

      माधव पवार
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांचा तालुक्यात अनेक ठिकाणी व कृष्णूरच्या समाधान रेस्टॉरंट येथे पस्तीसवा वाढदिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला सदरचा कार्यक्रम उत्कृष्ट करण्यासाठी व नियोजन करण्यासाठी जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे यांच मार्गदर्शन दैनिक आदर्श गावकरीचे पत्रकार माधव धडेकर व पत्रकार पवनकुमार पुट्टेवाड यांना लाभले तर या कार्यक्रमाला युवा उद्योजक कैलास जी बोंडले यावेळी उपस्थित होते 
तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी हे एक पोलीस वर्दीतील पोलीस अधिकारी आहेत आणि सूजळ नेतृत्व असलेले सपोनि पुरी यांच्या चेहऱ्यावर नेहमी हस्य व हसत मुखत बातचीत करीत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा विविध ठिकाणी दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी वाढदिवस व अभिष्टचिंतन त्यांच चाहते व हित चिंतक यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे
कुंटूर पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी महादेव पुरी यांचा वाढदिवस नरसी शहर मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज दि.२९ जानेवारी २०२३ रोजी सकाळी पुरी साहेबांच्या निवासस्थानी साजरा केला याप्रसंगी जेष्ठ पत्रकार मनोहर तेलंग, राम भाउ तरटे,सुभाष पेरकेवार, आनंदराव सुर्यवंशी, गोविंद नरसीकर,दिलीप वाघमारे,दिलीप शिंदे उपस्थित होते
कुंटूर ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी महादेव पुरी हे पत्रकार असो जनसामान्य माणूस असो यांचे ते चाहते बनले आहेत म्हणून त्यांचा पस्तीसवा वाढदिवस ठिकठिकाणी साजरा होताना सोशियल मीडियाच्या माध्यमातून दिसून येत आहे
सपोनि पुरी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नायगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने ही शाल व श्रीफळ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला आहे
रुई बु येथील गावचे माजी सरपंच प्रतिनिधी गजानन भुजंगराव पाटील शिंदे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला दैनिक पुण्य नगरीचे नायगाव तालुका प्रतिनिधी बाळासाहेब पांडे यांच्या ग्रुपच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला व दैनिक प्रजावाणीचे जेष्ठ पत्रकार सूर्यकांत सोनखेडकर यांनी सपोनि महादेव पुरी यांच्या सत्काराचे आयोजन केले होते
जेष्ठ पत्रकार प्रभाकरजी लखपत्रेवार यांनी सत्काराचे आयोजन केले होते त्याच बरोबर पत्रकार नागेश कल्याण यांच्या मार्फत ही सत्काराचे नियोजन करण्यात आले तर पत्रकार गोविंद नरसीकर यांनी सत्कार व अभिष्टचिंतन करून सपोनि महादेव पुरी यांना भरघोस शुभेच्छा देऊन पेढे तोंडात भरविले यावेळी जेष्ठ पत्रकार मनोहर तेलंगसह आदी पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते 

Post a Comment

0 Comments