Header Ads Widget

शासकीय जागेवरील दलिताचे घरे हटावण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतने केल्यास ग्रामपंचायतच्या दोन सदस्यांचा आत्मदहन करण्याचा जिल्हाधिकाऱ्याना दिलेल्या निवेदनात इशारा ? -

      माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे माळइकळीची ग्रामपंचायत कार्यालय कोणत्या न कोणत्या कारणा वरून वादग्रस्त ठरत असतानाच शासकीय जागेवरील दलिताचे घरे ग्रामपंचायतच्या यंत्रनेने हाटविण्याचा प्रयत्न केल्यास याच ग्रामपंचायतचे दोन विद्यमान सदस्य आत्मदहन करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्याना देण्यात आले
तालुक्यातील माळ इकळी येथे सदरच्या अतिक्रमण काढण्याच्या कारणा वरून गावांत नेहमी जातीय तणाव निर्माण होत असताना सुद्धा या गावाच्या महिला ग्रामसेविका सौ विद्याताई मोरे यांच्यासह सरपंच सौ रेखा कैलास सूर्यवंशी व उपसरपंचानी हा उगाच रिकामा विषय लावून धरला असल्यामुळे गावात अनेक वेळा जातीय तणाव निर्माण होत आहेअतिक्रमण काढण्यासाठी शासन निर्णय असला तरी 
इकळीमाळ ग्रामपंचायतने अतिक्रमण केलेल्यांना नमुना नंबर ८ दिला असताना सुद्धा तेच अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायत विषय लावून धरला असल्यामुळे गावात जातीय तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जाते सदरची अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली असल्यामुळे सदरच्या चुकीच्या शासन निर्णयाला दोन ग्रामपंचायत सदस्यांनीच विरोध केला आहेइकळीमाळ येथील अन्य जागेवर अतिक्रमण असताना मागासवर्गीयांचेच अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करत असल्यामुळे या प्रयत्नाला ग्रामपंचायत सदस्य म्हणून मि. सौ. पदमिनबाई दत्ता सुर्यवंशी व गंगाधर आनंदा सुर्यवंशी यांनी कडाडून विरोध केला असून. गोरगरिबांची घरे हटवण्याचा निर्णय मागे नाही घेतल्यास व सरपंच व उपसरपंच आणि ग्रामसेविकाची मनमानी नाही थांबल्यास आत्मदहन करण्याचा ही इशारा ? दिला आहे.

दलिताचे अतिक्रमण काढल्यास आत्म दहन करण्याचा जिल्हाधिकाऱ्याना दिलेल्या निवेदनात केला असून मागावसर्गीय अतिक्रमण वस्ती हटावाची मोहीम नाही थांबल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे 

Post a Comment

0 Comments