Header Ads Widget

बिलोली तालुक्यात घरकुल योजनेचे बिले काढण्यासाठी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्या कडून टाळाटाळ ?

 

 नायगाव फास्ट न्यूज नेटवर्क : बिलोली - 

बिलोली तालुक्यातील ७३ ग्रामपंचायत  कार्यालय अंतर्गत येणारे शासनाकडून  रमाई आवास योजना पंतप्रधान घरकुल योजना  शासनाने मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना झोपडी मुक्त करण्याचे शासनाचे धोरण आहे

या योजनेचा मोठ्या थाटात घरकुल योजनेचा गाजावाजा केले परंतु बिलोली पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याच्या बेजबाबदार पणामुळे घरकुलाची बिले लाभार्थाना पहिला हाप्ता मिळाले आहे

पंचायत समितीच्या अंतर्गत असलेल्या अनेक गावात घरकुल पूर्ण होत असताना सुद्धा पंचायत समिती कडून  लाभार्थाचे पिळवणुक करित आसल्याचेही घरकुल धारकाकडुन बोलले जात आसुन सदरच्या  कर्मचाऱ्यांवर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांची वचक नसल्यामुळे पंचायत समितीचे संगणक चालक मोकाट फिरताना दिसुन येत आहे 

घरकुलाचे बिले काढण्यासाठी दोन आँपरेटर असताना सुद्धा काही तांत्रिक आडचणीमुळे होत नसले तरी कामे कामे वेळेत पूर्ण करण्याच्या जबाबदारी यांच्यावर असल्यामुळे सदरच्या लक्ष देण्याची गरज भासत आहे 

तालुक्यातील घरकुल लाभार्थी घराचे काम पूर्ण करण्यासाठी शासनाच्या निधीची वाट पाहून  स्वखर्चातून घरकुल पुर्ण करीत असल्याचे चित्र बिलोली तालुक्यात पहावयास मिळत असल्यामुळे प्रशासनाच्या दरबारात आंधळ दळत कुत्र पीठ खातय अशी गत निर्माण झाल्याचे सदरील लाभार्थात्यातून बोलल्या जात आहे

पंचायत समिती बिलोली च्या गटविकास अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकारी यांनी गावागावात जाऊन घरकुलाची पाहणी करून लाभार्थ्‍यांना तात्काळ देयके  द्यावी अशी मागणी घरकुल लाभार्थाकडुन होत असून महाराष्ट्र शासन कोणत्याही योजनेची अंमलबजावणी करतात परंतु स्थानिक प्रशासन या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कुठे तरी अपयशी ठरत ? आहे की काय असा प्रश्न विचारला जात आहे


Post a Comment

0 Comments