Header Ads Widget

बरबडा नगरीचे वैभवच वेगळे धर्माधिकारी परिवारा कडून बैल गाडीतुन काढली ग्रन्थदिंडी ; वेगवेगळ्या वेष भुषात दिंडी अवतारली गावांत !!

      माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे बरबडा नगरीचे वैभवच वेगळे असल्यामुळे या नगरीत धर्माधिकारी परिवारातील एक नामांकित व्यक्तमत्व असलेले दिलीपराव धर्माधिकारी यांनी आयोजित केलेल्या पाचव्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या विशेष उत्साहाच्या निमित्ताने गावातील मुख्य रस्त्यानी पारंपारीक पद्धतीने सुंदर अशा बैल गाडीला बैल जंपून वेगवेगळ्या वेषभूषात ग्रन्थ दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे
बरबडा नगरी येथील गावात मिरवणूक काढण्यात आली असल्यामुळे एक प्रकारे पंढरपूर येथील सारखे गावांत वास्तव चित्र वातावरण पाहवयास मिळाले आहे 
--------------------------------------------------------------------
तालुक्यातील बरबडा येथील वास्तव ग्रन्थ दिंडीच्या माध्यमातून विशेष वारकऱ्या बरोबर शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता माँ जिजाऊ साहेब झाशीची राणी संत तुकाराम महाराज सावित्रीबाई फुले खंडेराय वाघ्या मुरळी अशा पद्धतीने सदरच्या ग्रन्थ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते
बरबडा येथे विध्यार्थीच्या माध्यमातून भजनी मंडळी तूळसी वृंदावन घेत मुलीनी अतिशय सुंदर पद्धतीने ग्रन्थ दिंडीचे नेतृत्व करीत होत्या. संत तुकाराम महाराज विठूबो , राधा कृष्णाची जोडी, बाल शिवराय, त्यांच्या मावळ्यांच्या वेशभूषा व शेतकऱ्यांचे गेल्या कित्येक वर्षा पासून पारंपारिक बैलगाडी वापरत असलेल्या बैलगाडी व ग्रन्थ दिंडीने अख्या बरबडा नगरीचे लक्ष विद्याथ्यांनी आकर्षण करून घेतले आहे

Post a Comment

0 Comments