नायगाव तालुक्यातील मौजे रुई बु येथे लहाना पासून ते मोठ्या पर्यंत चार ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात जिओ कंपनीची रेंज येत नसल्यामुळे कंपनीच्या कार्यप्रणालीवर या भागातील जनता चांगलीच वैतागली असून सदरची रेंज जिओ कंपनीच्या माध्यमातून सोडल्या जात नसल्यामुळे जिओ कंपनीचे दुर्लक्ष झाले असल्याने मोबाईल धारक चांगलेच संताप व्यक्त करत आहेतालुक्यातील रुई बु. हे गाव नायगाव धर्माबाद उमरी भोकर अशा चार तालुक्याला जोडल्या गेले असल्यामुळे या गावात कसल्याच प्रकारच्या कोणत्याही कंपनीचे टावर बसविण्यात आले नसल्यामुळे व जिओ कंपनीच्या माध्यमातून मोबाईल धारकांनी मोठ्या प्रमाणात जिओचे कार्ड खरेदी केले आहे
परंतु रेंज येत नसल्यामुळे या गावात कधी झिरो टक्के रेंज येते तर कधी पाच टक्के ही रेंज येत नसल्यामुळे सदरच्या जिओ कंपनीच्या मनमानीला गावकऱ्यासह या भागातील नागरिक चांगलेच वैतागले आहेतसदरच्या कंपनी कडून जिओचे कार्ड खरेदी करत असताना कंपनीने मोठ मोठ्या ऑफर दिल्या होत्या व रेंज पूर्वी येत होती त्यामुळे या भागातील सदरील जनता मोठ्या प्रमाणात जिओकडे वळली असल्याने आता सरळ सरळ जिओचे दुर्लक्ष झाले आहे
रुई बु गावात रेंजचा बेपत्ता असून जिओ कंपनी धारकांनी रुई बु. येथे एक तर जिओचे टावर बसवावे नसता रेंज सोडावी अशी मागणी या विभागातील जनतेसह मोबाईल धारकाने केली असून सदरची कंपनी ही ग्रामीण भागातील जनतेसाठी असून अडचण नसून कोळंबा असल्याचे ही सदरच्या जनतेतून बोलल्या जात आहे

0 Comments