Header Ads Widget

सन्माननीय मोदी साहेब शेतकऱ्यांच्या सन्मान निधी योजनेत ६ हाजार रुपयात १२ महिन्यात उदरनिर्वाह भागणार कसा ? किमान १२ हाजार रुपये तरी द्यावेत !!

       माधव पवार
देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबानी देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी पंतप्रधान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दर महिन्याला केवळ ५०० रुपये तर ४ महिन्याला २००० हाजार आणि १२ महिन्याला ६००० रुपये देऊन शेतकऱ्यांना खूष करण्यात आले परंतु देशात महागाईचा भडका मोठया प्रमाणात वाढला आणि महागाईच्या खाईत शेतकऱ्यांना जीवन जगावे लागत आहे
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना ही सन १  डिसेंबर २०१८ पासून राबविण्यासाठी मान्यता देण्यात आली योजनेची महत्वपूर्ण अंमलबजावणी करताना  राज्यस्तरीय विभागस्तरीय जिल्हा स्तरीय तालुकास्तरीय आणि ग्रामस्तरीय समित्यांच्या नियुक्ती शासन निर्णय नुसार कृषी विभागातर्फे जाहीर करण्यात आली आहेसन्माननीय मोदी साहेब शेतकऱ्यांच्या सन्मान योजनेत वर्षा ६ हाजार रुपये देऊन एकीकडे शेतकऱ्यांना खूष करताहेत दुसरीकडे मोठया प्रमाणात महागाई वाढली १२ महिन्यात ६ हाजार रुपये देत असल्यामुळे शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह कसा भागणार ? किमान १२ हाजार रुपये तरी बारा महिन्याला तरी दिल्यास शेतकऱ्यांचा कसा बसा खर्च भागेल दर महिन्याला ५०० रुपये तर चार महिन्याला ते वेळेवर मिळेनात कमीत कमी वर्षाला १२ हजार रुपये देण्याची पंतप्रधान मोदी साहेबानी घोषणा करतील काय अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे

  !!  प्रशासनासह पीक विमा कंपनीचा कागदी घोडा ?  !!     

प्रशासनासह विमा कंपनी धारकाचे गेल्या काही महिन्या पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा करण्यासाठी नुसते कागदी घोडेच नाचत आहेत परंतु अद्याप शेतकऱ्यांना पूर्ण पणे पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले नसल्यामुळे शेतकऱ्यांतुन नाराजी व्यक्त केली आहे

गेल्या दोन तीन महिन्याखाली २५ टक्के वाढीव विमा जमा करण्यात आला परंतु कंपनी मार्फत दिला जाणारा पीक विमा कधी जमा करणार हा महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसात असल्यामुळे तात्काळ जमा करण्यात यावा अशी होत आहे

Post a Comment

0 Comments