नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात सर्व काही जोमात असले तरी त्या उलट म्हणजे सर्व अधिक रस्ते कोमात असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत असून शासन एका बाजूने रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत अतिशय मोहीम प्रभावी पणे राबवीत असते आणि दुसऱ्या बाजूने अनेक रस्त्याची विल्हेवाट लागली असल्यामुळे अपघाताचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे
खेड्या पाडयातील रस्त्यापेक्षा माळ रान बरे म्हण्याची वेळ जन सामान्य माणसांवर आली असून प्रशासन अनेक बाबीवर मोठया प्रमाणात खर्च करतो परंतु रस्त्याच्या बाबतीत पाहिले साफ दुर्लक्ष करीत असतो खेड्या पाडयाला जाण्याची रस्ते सुरक्षित झाले की प्रवास सुखाचा होतो आणि विकास झाल्याचे मोठया प्रमाणात दिसून येतो
मात्र खेड्यातील रस्ते हे वाहन धारकाच्या जीवाशी खेळत आहेत कोठे मोठं मोठाले खडे तर कुठे रस्त्यावर गिट्टीच गिट्टी कुठे पूल तुटके तर कुठे रस्त्याची बाजू ढासाळलेली असे असुरक्षित रस्ते असल्यामुळे जन सामान्य माणसाचा प्राण नाकात आल्याचे दिसून येते आहे
जर प्रशासनाने रस्त्यावर लक्ष देऊन रस्ते दुरुस्त केल्यास नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा जनसामान्यातुन व्यक्त होत असली तरी सर्व काही जोमात चालते परंतु रस्ते मात्र कोमात असल्याचे दिसून येत आहे

0 Comments