Header Ads Widget

स्वाधार योजने अंतर्गत दोन्ही वर्षाची रक्कम विद्यार्थांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे या मागणीसाठी इंद्रजीत डुमणे यांचे थेट मुख्यमंञ्याकडे मागणी


       माधव पवार
भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील विद्यार्थांना जिल्हाच्या ठिकाणी राहुन शिक्षण घेता यावे म्हणून सदरची योजना कार्यन्वित करण्यात आली असल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे सदरच्या विध्यार्थीच्या खात्यात विध्यार्थीची रक्कम जमा करण्यासाठी आदेशीत करावे या मागणीसाठी इंद्रजीत डूमने यांनी थेट मुख्यमंत्री यांना एका निवेदनाद्वारे कळविणले आहें
गेल्या दोन वर्षापासुन ई.स.२०२०-२१ व २०२१-२२ या दोन्ही वर्षाची स्वाधार योजनेची पुर्ण रक्कम अजुनही विद्यार्थांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही केवळ पाञ विद्यार्थां पैकी काही विद्यार्थांच्या खात्यात पहीला हप्ता जमा करण्यात आला आहे

तर अनेक विद्यार्थि पहील्या हप्त्या पासुनच वंचीतच असल्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थांना अनेक आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे.
शैक्षणिक वर्ष स.न २०२२ ते २०२३ हे जवळपास संपत येत आहे

तरी मागील दोन वर्षाची पुर्ण रक्कम तात्काळ पाञ विद्यार्थांच्या बँक खात्यात जमा करुन मागासवर्गीय विद्यार्थांना न्याय मिळवुन द्यावा व शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षाचे स्वाधार योजनेचे अर्ज भरुन घेण्यात यावे अशी विनंती सामाजीक कार्यकर्ते इंद्रजीत डुमणे गागलेगावकर यांनी ई मेल द्वारे  निवेदन पाठवुन  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांना केली

Post a Comment

0 Comments