Header Ads Widget

बरबडा येथील संस्था संस्कृती वारसा चालवणारी संस्था संमेलनाध्यक्ष इंद्रजित भालेराव


बरबडा :- किरण हणमंते 

बरबडा :- जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा येथे दि.२१ जानेवारी २०२३ रोजी गोविंदरावजी धर्माधिकारी बरबडेकर यांच्या स्मृती दिना निमित्त पाचवे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी नऊ वाजता ग्रंथ  दिंडीचे उदघाटन जवाहलाल नेहरू शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सदाशिवराव धर्माधिकारी बरबडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या ग्रंथ दिंडीत पारंपरिक रित्या वेशभूषा करण्यात आली त्यावेळी त्या ग्रंथ दिंडीत सर्व ग्रंथ ठेवण्यात आले होते. त्यामध्ये भारताचे संविधान, ज्ञानेश्वरी, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जिवन चरित्र पुस्तक, स्वामी विवेकानंद चे पुस्तक यांच्या बरोबर अनेक ग्रंथ व पुस्तके त्या दिंडीत ठेवण्यात आली होती. या दिंडीत मुला मुलींनी अनेक वेशभूषा परिधान केले होते. त्यामध्ये जय जवान जय किसान, माँ जिजाऊ साहेब, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल माऊली व रुक्मिणी, राधा कृष्ण, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान महाराज आणि मुक्ताई, जनाबाई, मिराबाई, वासुदेव या सहित त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे लेझीम पथक, पारंपरिक वेषातली वाघी मंडळी आपले गीत सादर करत होती. तसेच भजनी मंडळ आदिनी सहभाग ने नोंदविला होता.स्वातंत्र्य सेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी बरबडेकर सभागृहात पाचवे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्दघाटन लातूर बोर्डाचे विभागीय अध्यक्ष तथा सचिव  तेलंग साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर स्वागत गीताने मान्यवरांच स्वागत करण्यात आले. सर्व मान्यवारांचा सत्कार पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला आहे.यावेळी संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक इंद्रजीत भालेराव , संमेलनाचे माजी अध्यक्ष नारायण शिंदे, जवाहरलाल नेहरू विद्यालय संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर, संस्थेचे उपाध्यक्ष सदाशिवराव धर्माधिकारी बरबडेकर, संस्थेचे संचालक शिवाजीराव धर्माधिकारी बरबडेकर, बरबडा नगरीचे सरपंच माधवराव कोलगाने, देविदासराव नेरल्लेवाड, इरन्ना काका कंडापल्ले, बरबडा नगरीचे उपसरपंच सौ.छायाताई धर्माधिकारी, जगदिशराव धर्माधिकारी,

शाळेचे उपमुख्याध्यापक गणेश बडूरे, पर्यवेक्षक सुर्यकांत फड , ज्युनिअर कॉलेजचे पर्यवेक्षक वसंत शिंदे , प्रा.सुदर्शन धर्माधिकारी उपस्थित होते. यामध्ये शेतकरी गीत, नटरंग, आणि झूल्यात हलवा हे गीत मुलींनी सादर केले.
अध्यक्षीय भाषणात भालेराव म्हणाले कि बरबडा हे पूर्वीपासून च संस्कृती जपणार असून महाराष्ट्र भर प्रसिद्ध असल्याचे सांगितले. या ग्रामिण साहित्य संमेलनामुळे खेड्यातील मुलांना एक प्रकारची चालना मिळून योग्य दिशा मिळते आणि येथूनच एक कवी, साहित्यिक, लेखक घडू शकतो असे ते म्हणाले अनेक कविता सांगून त्यांची प्रसिद्ध असणारी "गावाकडं चल माझ्या दोस्ता " विद्यार्थी यांच्या सोबत गायली. उदघाटन पर बोलताना लातुर बोर्डाचे तेलंग यांनी या शाळेचे कौतुक केले

आणि येथील विद्यार्थ्यांचे विशेष असे अभिनंदन केले. त्यांनी एक कविता म्हणून दाखवली इतक्या मोठया प्रमाणात एका खेड्यात असे साहित्य  संमेलन बघून खुप आनंद झाला असुन अशा कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन यायला सुद्धा भाग्य लागते असे ते म्हणाले. सर्वांनी या शाळेचे अध्यक्ष तथा प्राचार्य यांचे भरभरून कौतुक केले आहे. या पुढेही असाच वारसा चालु ठेवण्यात यावे असा मोलाचा संदेश देण्यात आला.या संमेलनाचे सूत्रसंचालन मनिषा देशमुख आणि दिपाली  मेलकेवाड व प्रा. शिवाजी हंबर्डे यांनी केले तर आभार प्रा. तगडपल्लेवार यांनी केले.दुपारच्या सत्रात कथाकथन आयोजित केले होते. या  कथाकथनाचे अध्यक्ष मा.श्री राजेंद्र गहाळ हे होते, सौ. सरोज शिंपाळे, दिंगबर कदम, वैजनाथ अनमूलवाड, जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्चमाध्मक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उजमा शेख, गायत्री वटपलवाड यांचा सहभाग होता या सर्वांनी आपापल्या कथा उत्कृष्ट पणे कथा सादर केल्या. या कथा कथन चे सूत्रसंचालन प्रा. सोळंके तर आभार सहशिक्षक संतोष पचलिंग केले.
तिसऱ्या सत्रात कविसंमेलन चे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये प्रतिक्षा ढगे, ज्ञानेश्वर शिंदे, सोपान देगावकर, पंडित पाटील, लक्ष्मण मलगीवार, आनंद यलपलवाड, व्यंकट आनेराय, प्रकाश काळे, दिगंबर कानोले, नरेंद्र नाईक, उजमा शेख, पांडुरंग पुढेवाड, संदीप भूरे, अंजली मुनेश्वर, बालाजी पेठेकर, शंकर राठोड, महेश मोरे, शेख जाफर, ज्योती गायकवाड, शिवाजी जोगदंड, नागोराव डोंगरे, व्यंकटेश काटकर, गोविंद कवळे, रोहीनी पांडे, नरेंद्र घोंगडे, प्रल्हाद घोरबांड, गायत्री वटपलवाड, अजय सुर्यतळ, मनीषा मद्देवाड , गोदावरी गायकवाड यांनी सहभाग घेतला होता. या कवी संमेलनाचे सुत्रसंचलन अशोक कुबडे, विरभद्र मिरेवाड, श्रीनिवास मस्के यांनी केले तर आभार प्रा.सुदर्शन धर्माधिकारी यांनी केले.

हे संमेलनात यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.





Post a Comment

0 Comments